** जिल्हा माहिती कार्यालयाच्या संकेतस्थळावर आपले स्वागत ** बातम्या, लेख, पर्यटन विषयक माहिती, पत्रकारांसाठीच्या विविध योजना, लोकराज्यसह इतर **

Sunday, August 23, 2020

जिल्ह्यातील राज्य व प्रमुख मार्ग बंद; पर्यायी मार्गाने वाहतूक सुरु

 


कोल्हापूर, दि. 23 (जिल्हा माहिती कार्यालय): जिल्ह्यात झालेल्या पावसामुळे जिल्ह्यातील राज्यमार्ग व प्रमुख जिल्हा मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत. पर्यायी मार्गाने वाहतूक वळविण्यात आली असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाचे सहाय्यक अधीक्षक अभियंता श्रीधर घाटगे यांनी दिली.

करवीर तालुक्यातील शिंगणापूर रामा-194 तसेच शिंगणापूर केटीवेअर रस्त्यावर पाणी आल्याने वाहतूक बंद, बाचणी बंधाऱ्यावर पाणी आल्याने इस्फूर्ली, नागाव, खेबवडे, बाचणी मार्गे वाहतुक सुरू.

पन्हाळा तालुक्यातील केर्ली जोतिबा रस्ता खचल्याने गायमुख वळण रस्त्यावरून मार्गे वाहतूक सुरू.

        हातकणंगले तालुक्यातील इचलकरंजी नवीन पुलावरुन वाहतूक सुरू, रांगोळी ते इचलकरंजी पुलादरम्यान पाणी आल्याने रेंदाळ, बोरगाव, इचलकरंजीमार्गे वाहतुक सुरू, भेंडवडे गावाजवळ पाणी आल्याने भेंडवडे, सावर्डे, पेठवडगाव मार्गे वाहतुक सुरू.

शिरोळ तालुक्यातील शिरढोण पुलावर पाणी आल्याने नांदणी जयसिंगपूर मार्गे वाहतूक सुरु, हेरवाड गावाजवळ पाणी आल्याने लाट, लटवाडी, घोसारवाड, प्रजिमा क्र. 32 मार्गे वाहतुक सुरू, नांदणी ते शिरोळ रस्त्यावर पाणी आल्याने प्रजिमा क्र. 105 नांदणी, जयसिंगपूरमार्गे वाहतुक सुरू, कुरूंदवाड ते नांदणी पुलावर पाणी आल्याने कुरूंदवाड, जयसिंगपूरमार्गे वाहतुक सुरू. जुने दानवाड गावाजवळ पाणी आल्याने टाकळेवाडी, दत्तवाड मार्गे वाहतुक सुरू.

कागल तालुक्यातील सर पिराजीराव तलावातील पाणी रस्त्यावर आल्याने हासुर, बोळावी, ठाणेवाडी व देवगड, राधानगरी मार्गे वाहतूक सुरु. बस्तवडे बंधाऱ्यावर पाणी आल्याने अनुर ते बानगे मार्गे वाहतूक सुरु.

राधानगरी तालुक्यातील  शिरगाव बंधाऱ्यावर पाणी आल्याने तारळे व राशिवडे मार्गे वाहतूक सुरु.

00000

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.