** जिल्हा माहिती कार्यालयाच्या संकेतस्थळावर आपले स्वागत ** बातम्या, लेख, पर्यटन विषयक माहिती, पत्रकारांसाठीच्या विविध योजना, लोकराज्यसह इतर **

Tuesday, August 18, 2020

आजअखेर 8 हजार 80 जणांना डिस्चार्ज -डॉ. बी. सी. केम्पी पाटील

 


   कोल्हापूर,दि. 18 (जिल्हा माहिती कार्यालय) : आज संध्याकाळी 5 वाजेपर्यंत आरटीपीसीआर आणि सीबीएनएएटी चाचणीचे 734 प्राप्त अहवालापैकी 364 निगेटिव्ह तर 266 अहवाल पॉझीटिव्ह आहेत. (84 अहलवाल प्रलंबित, 4 जणांचा दुसराही अहवाल पॉझीटिव्ह, 16 अहवाल नाकारण्यात आले) अॅन्टीजेन टेस्टिंग चाचणीचे 805 प्राप्त अहवालापैकी निगेटिव्ह 665 तर 140 पॉझीटिव्ह (91 निगेटिव्ह अहवाल आरटीपीसीआरसाठी तपासणीसाठी पाठविले), असे एकूण 406 अहवाल पॉझीटिव्ह आहेत.

जिल्ह्यात आजअखेर एकूण 15 हजार 679 पॉझीटिव्हपैकी 8 हजार 80 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आजअखेर जिल्ह्यात एकूण 7 हजार 160 पॉझीटिव्ह रुग्ण आहेत, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बी. सी. केम्पी-पाटील यांनी आज दिली.

आज संध्याकाळी 5 वाजेपर्यंत प्राप्त 406  पॉझीटिव्ह अहवालापैकी आजरा-15, भुदरगड-11, चंदगड-2, गडहिंग्लज-14, हातकणंगले-76, कागल-1, करवीर-48, पन्हाळा- 11, राधानगरी- 10, शाहूवाडी-8, शिरोळ- 17, नगरपरिषद क्षेत्र- 93, कोल्हापूर महापालिका क्षेत्र- 94 व इतर शहरे व राज्य 6 असा समावेश आहे.

आजअखेर तालुका, नपा आणि मनपा क्षेत्रनिहाय रुग्णांची संख्या पुढीलप्रमाणे - आजरा-264, भुदरगड- 335, चंदगड- 464, गडहिंग्लज- 406, गगनबावडा- 38, हातकणंगले-1687, कागल- 280, करवीर- 1697, पन्हाळा- 493, राधानगरी- 399, शाहूवाडी- 403, शिरोळ- 760, नगरपरिषद क्षेत्र-3206, कोल्हापूर महापालिका क्षेत्र-4853 असे एकूण 15 हजार 285 आणि इतर जिल्हा व राज्यातील - 394 असे मिळून एकूण 15 हजार 679 रुग्णांची आजअखेर जिल्ह्यात संख्या आहे.

            जिल्ह्यातील एकूण 15 हजार 679 पॉझीटिव्ह रूग्णांपैकी 8 हजार 80 रूग्णांना डिस्चार्ज मिळाला आहे. तर एकूण 439 जणांचा मृत्यू झाला असल्यामुळे आजअखेर उपचारार्थ दाखल झालेल्या जिल्ह्यातील रूग्णांची संख्या 7 हजार 160 इतकी आहे.

0000000

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.