जिल्ह्यातील राज्य व प्रमुख मार्ग बंद; पर्यायी मार्गाने वाहतूक सुरु
कोल्हापूर, दि. 16 (जिल्हा माहिती कार्यालय): जिल्ह्यात झालेल्या पावसामुळे जिल्ह्यातील
राज्यमार्ग व प्रमुख जिल्हा मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत. पर्यायी
मार्गाने वाहतूक वळविण्यात आली असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाचे
सहाय्यक अधीक्षक अभियंता श्रीधर घाटगे यांनी दिली.
करवीर
तालुक्यातील शिंगणापूर रामा-194 तसेच
शिंगणापूर केटीवेअर रस्त्यावर पाणी आल्याने वाहतूक बंद, वडणगे राजाराम बंधाऱ्यावर
पाणी आल्याने रामाम 204 रत्नागिरी कोल्हापूर हायवे मार्गे वाहतूक सुरू.
कागल
तालुक्यातील सर पिराजीराव
तलावातील पाणी रस्त्यावर आल्याने हासुर, बोळावी, ठाणेवाडी व देवगड, राधानगरी, मुरगुड
मार्गे वाहतूक सुरु, सुळकूड कागणोळी रस्त्यावर
पाणी आल्याने रामा4 कोगणोळी मार्गे वाहतूक सुरू,
पन्हाळा
तालुक्यातील केर्ली जोतिबा
रस्ता खचल्याने गायमुख वळण रस्त्यावरून मार्गे वाहतूक सुरू.
0000000
No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.