** जिल्हा माहिती कार्यालयाच्या संकेतस्थळावर आपले स्वागत ** बातम्या, लेख, पर्यटन विषयक माहिती, पत्रकारांसाठीच्या विविध योजना, लोकराज्यसह इतर **

Monday, August 24, 2020

अपंग बालकांना शासकीय संस्था मिरज येथे मोफत प्रवेश

 


कोल्हापूर, दि. 24 (जिल्हा माहिती कार्यालय): अपंग (अस्थिव्यंग) बालकांसाठी मोफत शिक्षण, वसतीगृह व गरजेनुसार अस्थिव्यंगोपचार शस्त्रक्रिया व कृत्रिम अवयव पुरविणारी शासकीय निवासी संस्था किल्ला भाग मिरज येथे आहे. या संस्थेत सन 2020-21 या शैक्षणिक वर्षासाठी प्रवेश प्रक्रिया सुरु असल्याचे शासकीय अंपग बालगृहाचे अधिक्षक यांनी कळविले आहे.

ही मोफत शिक्षण सुविधा असून संस्थेच्या परिसरात 1 ली ते 4 थी पर्यंतचे मोफत शिक्षण, इयत्ता 5 वी पासून पुढील शिक्षण माध्यमिक शाळेमार्फत, माध्यमिक शाळेत जाण्यासाठी व येण्यासाठी मोफत वाहतुकीची सुविधा, पाठ्यपुस्तके वह्या, इतर शैक्षणिक साहित्य व शालेय गणवेश मोफत, मुलींसाठी विशेष काळजी घेण्यासाठी महिला काळजीवाहक असणार आहे.

            वसतिगृहात अपंग मुला-मुलींची स्वतंत्र निवास व्यवस्था व मोफत जेवणाची सुविधा आहे. प्रत्येक विद्यार्थ्यांस कॉट, गादी, बिछनाव इतर साहित्याचा मोफत पुरवठा, दररोज अंघोळीसाठी गरम पाणी, शुध्द व थंडगार पाण्याची सुविधा.

            शस्त्रक्रिया भौतिकोपचार सुविधा- अस्थिव्यंगोपचार तज्ञांच्या सल्ल्यानुसार गरजेनुसार शस्त्रक्रिया व भौतिकोपचार सुविधा, गरजेनुसार कृत्रिम अवयव, कुबड्या, तीन चाकी सायकल वाटप.

            प्रवेशाबाबत अटी- प्रवेशित अस्थिव्यंग असला पाहिजे, वयोगट 6 ते 14 वर्षे, अर्जासोबत सिव्हील सर्जन यांनी दिलेल्या अपंगत्वाचा दाखला, शाळा सोडल्याचा दाखला, उत्पन्नाचा दाखला, 3 फोटो. प्रवेश अर्ज व महितीपत्रक अधीक्षक, शासकीय अपंग बालगृह व शाळा, किल्ला भाग, बी. एस. एन. एल. ऑफिस शेजारी, मिरज 416410 या पत्यावर समक्ष अथवा पोस्टाद्वारे मोफत मिळतील असे पाठवावे. अधिक माहितीसाठी 9325555981, 9860642680, 9422216459, 9130448195 या क्रमांकावर संपर्क साधावा.

0000

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.