कोल्हापूर, दि. 25 (जिल्हा माहिती कार्यालय): जिल्ह्यात झालेल्या पावसामुळे जिल्ह्यातील
राज्यमार्ग व प्रमुख जिल्हा मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत. पर्यायी
मार्गाने वाहतूक वळविण्यात आली असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाचे
सहाय्यक अधीक्षक अभियंता श्रीधर घाटगे यांनी दिली.
करवीर
तालुक्यातील शिंगणापूर रामा-194 तसेच
शिंगणापूर केटीवेअर रस्त्यावर पाणी आल्याने वाहतूक बंद.
पन्हाळा
तालुक्यातील केर्ली जोतिबा
रस्ता खचल्याने गायमुख वळण रस्त्यावरून मार्गे वाहतूक सुरू.
हातकणंगले तालुक्यातील इचलकरंजी नवीन पुलावरुन वाहतूक सुरू,वडगाव,
लाटवडे, भेंडवडे, खोची मार्गावर पाणी आल्याने भेंडवडे, सावर्डे, पेठवडगाव मार्गे
वाहतुक सुरू.
शिरोळ
तालुक्यातील शिरढोण पुलावर
पाणी आल्याने नांदणी जयसिंगपूर मार्गे वाहतूक सुरु, नांदणी ते शिरोळ रस्त्यावर
पाणी आल्याने प्रजिमा क्र. 105 नांदणी, जयसिंगपूर मार्गे वाहतुक सुरू, जुने दानवाड
गावाजवळ पाणी आल्याने टाकळेवाडी, दत्तवाड मार्गे वाहतुक सुरू.
कागल
तालुक्यातील सर पिराजीराव
तलावातील पाणी रस्त्यावर आल्याने हासुर, बोळावी, ठाणेवाडी व देवगड, राधानगरी
मार्गे वाहतूक सुरु. बस्तवडे बंधाऱ्यावर पाणी आल्याने अनुर ते बानगे मार्गे वाहतूक
सुरु.
00000
No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.