कोल्हापूर, दि. 20 (जिल्हा माहिती कार्यालय): सन 2020-21
या वर्षासाठी प्राथमिक शिक्षण पदविका डी.एल.एड. प्रथम वर्षाच्या शासकीय कोट्यातील
ऑनलाईन अर्ज दि. 31 ऑगस्ट पर्यंत भरण्याचे आवाहन जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण
संस्थेचे प्राचार्य डॉ. आय.सी.शेख
यांनी केले आहे.
प्रवेशाबाबत सूचना व ऑनलाईन प्रवेश अर्ज
महाराष्ट्र विद्या प्राधिकरण पुणे यांच्या www.maa.ac.in
या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. इच्छूक उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज भरावेत. अर्जाची
पडताळणी अधिकाऱ्याने ऑनलाईन पडताळणी केल्याशिवाय विद्यार्थ्यांचा अर्ज प्रवेश
प्रक्रियेत समाविष्ट होणार नाही. विद्यार्थ्यांना एसएमएसव्दारे कळविले जाणार आहे.
अधिक माहितीसाठी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, कोल्हापूर येथे 0231-2581831
या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा.
000000
No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.