** जिल्हा माहिती कार्यालयाच्या संकेतस्थळावर आपले स्वागत ** बातम्या, लेख, पर्यटन विषयक माहिती, पत्रकारांसाठीच्या विविध योजना, लोकराज्यसह इतर **

Monday, August 10, 2020

जिल्ह्यातील 24 गावांमधील 1885 कुटुंबातील 5584 व्यक्तींचे स्थलांतर -जिल्हाधिकारी दौलत देसाई

 


 कोल्हापूर, दि. 10 (जिल्हा माहिती कार्यालय):  जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे 24 गावांमधील 1885 कुटुंबातील 5584 व्यक्तींचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिली. 

      स्थलांतरीत कुटुंबांची तालुकानिहाय माहिती पुढीलप्रमाणे गडहिंग्लज बाधित गावांची संख्या 2, 5 कुटुंबातील 21 व्यक्ती, 14 जनावरे. आजरा 1, एका कुटुंबातील 9 व्यक्ती, पन्हाळा- बाधित 2 गावातील 3 कुटुंबातील 14 व्यक्ती एका जनावरासह स्थलांतर झाले आहे. करवीर- 3 बाधित गावांमध्ये 1701 कुटुंबातील 4861 व्यक्ती आणि 1038 जनावरे स्थलांतरीत करण्यात आले आहेत.  गगनबावडा -बाधित 8 गावांमधील 21 कुटुंबातील 107 व्यक्तींचे आणि 32 जनावरांचे स्थलांतर झाले आहे. चंदगड-  बाधित 6 गावातील 97 कुटुंबातील 377 व्यक्ती 47 जनावरांचे स्थलांतर करण्यात आले आहे. कोल्हापूर महानगरपालिका क्षेत्रातील 51 कुटूंबातील 177 नागरिकांचे स्थलांतरीत करण्यात आले आहे.

            अशा जिल्ह्यातील एकूण 24 गावांमधील 1885 कुटुंबातील 5584 व्यक्तींना आणि 1132 जनावरांना  सुरक्षित ठिकाणी स्थलांतरीत करण्यात आले आहे.

जिल्ह्यातील 6 संक्रमण शिबीरात 438 जण

पुरबाधीतासाठी जिल्ह्यामध्ये 6 ठिकाणी उघडण्यात आलेल्या संक्रमण शिबीरात 170पुरुष 144 महिला तर 129 लहान मुले अशा 443 जणांचा समावेश आहे. कोल्हापूर शहरात उघडण्यात आलेल्या 1 शिबीरात 177, गडहिंग्लजमधील शिबीरात 18 आणि चंदगड मधील 4 ठिकाणच्या शिबीरात 248 जणांचा समावेश आहे.

0000

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.