इंडिया ई च्या Dictionary मध्ये जिमाका चा ब्लॉग

गुरुवार, ६ ऑगस्ट, २०२०

जिल्ह्यातील 34 मार्ग बंद; पर्यायी मार्गाने वाहतूक सुरु


 

कोल्हापूर, दि. 6 (जिल्हा माहिती कार्यालय): आज सकाळी 9 वा. च्या अहवालानुसार जिल्ह्यात झालेल्या पावसामुळे जिल्ह्यातील 9 राज्यमार्ग व 25 प्रमुख जिल्हा मार्ग असे एकूण 34 मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत. पर्यायी मार्गाने वाहतूक वळविण्यात आली असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाचे सहाय्यक अधीक्षक अभियंता श्रीधर घाटगे यांनी दिली.

करवीर तालुक्यातील कोल्हापूर शहराचा बाह्यवळण रस्ता कळंबे साळोखेनगर, बालिंगे, शिंगणापूर रामा-194 मार्गावरील शिंगणापूर केटीवेअर रस्त्यावर 3 फूट पाणी आल्याने वाहतूक बंद असून आंबेवाडी चिखली मार्गे पर्यायी वाहतूक सुरू आहे. 

पन्हाळा तालुक्यातील कोल्हापूर चिखली बाजारभोगाव राज्य मार्ग क्र. 193 मार्गावरील करंजफेन गावाजवळ रस्त्यावर 4 फुट पाणी आल्याने तसेच पेंडाखळे, कांटे, बर्की, मौसम, पोहाळे पुलावर पाणी आल्याने वाहतुक बंद असून पोहाळे-पोहळेवाडी मार्गाने व मलकापूर यळवण मांजरे अनुस्कुरा मार्गे पर्यायी वाहतूक सुरू.

चंदगड तालुक्यातील  कोल्हापूर,परिते, गारगोटी,गडहिंग्लज, कोदाळी भेडशी ते राज्यमार्ग हद्द रा.मा. क्र. 189 मार्गावरील चंदगड पुलावर 2 फूट पाणी आल्याने व पर्यायी मार्ग नसल्याने वाहतूक बंद आहे.  चंदगड गावाजवळ रस्त्यावर पाणी आल्याने वाहतूक बंद असून शिरगाव हेरे मार्गे व शिरगाव हिंडगाव मार्गे पर्यायी वाहतूक सुरू आहे. तसेच गडहिंग्लजमधील भडगाव पुलावर 1.6 फूट पाणी आल्याने वाहतूक बंद असून गडहिंग्लज, आजरा नेसरी मार्गे पर्यायी वाहतूक सुरू आहे.

चंदगड तालुक्यातील  चंदगड, इब्राहिमपूर, आजरा, महागांव, हलकर्णी, खानापूर जिल्हा हद्दीपर्यंत रा.मा.क्र. 201 मार्गावरील इब्राहिमपूर पुलावर 3 फूट  पाणी आल्याने वाहतूक बंद असून कनूर गवसे इब्राहिमपूर अडकूर प्रजिमा क्र. 66 ते रा.मा. क्र. 189 प्रजिमा मार्गे पर्यायी वाहतूक सुरू आहे. तसेच गडहिंग्लजमधील उंबरवाडी कॉजवेवर पाणी आल्याने रस्ता बंद असून सुळे महागाव मार्गे पर्यायी वाहतुक सुरू आहे.

गगनबावडा तालुक्यातील गगनबावडा कोल्हापूर पट्टणकोडोली, हुपरी, रेंदाळ, जंगमवाडी राज्य हद्दीपर्यंत राज्य मार्ग क्र. 177 मार्गावरील मांडुकली गावाजवळील ओढ्यावर 2 फूट पाणी व कोदे फाट्याजवळ 2 फूट पाणी आल्याने व पर्यायी मार्ग नसल्याने वाहतुक बंद आहे. तसेच हातकणंगलेमधील ऐतवडे गावाजवळ पुलावर पाणी आल्याने वाहतुक बंद असून एकेरी वाहतुक सुरू आहे.

चंदगड तालुक्यातील शिरगांव नागनवाडी तडशिनहाळ रा.मा.क्र. 180 मार्गावरील दाटे गावाजवळ  रस्त्यावर पाणी आल्यामुळे व कानूर खुर्द पुलावर पाणी आल्याने वाहतूक बंद असून आमरोली सोनारवाडी मार्गे पर्यायी वाहतूक सुरू आहे.

हातकंणगले तालुक्यातील पन्हाळा, वाघबीळ, बोरपाडळे, इचलकरंजी, शिरदवाड रा.मा.क्र. 192 मार्गावर इचलकरंजी जुन्या पुलावरून वाहतुक बंद असल्याने इचलकरंजी नव्या पुलावरून वाहतुक सुरू आहे.

आजरा तालुक्यातील आंबोली, आजरा,गडहिंग्लज, संकेश्वर राज्य हद्दीपर्यंत रा.मा. 188 मार्गावर व्हिक्टोरीया पुलाने धोक्याची पातळी ओलांडल्यामुळे तसेच गिजवणेजवळील पुलावर व दुंडगे गावाजवळ रस्त्यावर पाणी आल्याने वाहतुक बंद असून राधानगरी, दाजीपूर मार्गे पर्यायी वाहतुक सुरू आहे.

शिरोळ तालुक्यातील  अतिग्रे, कबनुर, इचलकरंजी, शिरढोन, मजरेवाडी, टाकळी, खिद्रापुर ते जिल्हा हद्द रा.मा.200 मार्गावरील शिरढोण पुलावर 3 फुट पाणी आल्याने वाहतुक बंद असून नांदणी, जयसिंगपूरमार्गे पर्यायी वाहतुक सुरू आहे.

आजरा तालुक्यातील नवले, देवकांडगाव, साळगाव, प्रजिमा क्र. 58 मार्गावर साळगाव बंधाऱ्यावर 3 फूट पाणी आल्याने वाहतुक बंद असून ओडीआर 139 सोहाळे, बाची मार्गे पर्यायी वाहतुक सुरू आहे.

करवीर तालुक्यातील  शिरोली दुमाला, बाचणी प्रजिमा क्र. 37 मार्गावरील बाचणी बंधाऱ्यावर 2 फूट पाणी आल्याने वाहतुक बंद असून कसबा बीड घानवडे प्रजिमा 29 मार्गे पर्यायी वाहतूक सुरु आहे.

चंदगड तालुक्यातील गुडवळे, खामदळे, हेरे सावर्डे, हलकर्णी प्रजिमा क्रं. 71 मार्गावरील करंजगाव पुलावर 2 फुट पाणी आल्याने व पर्यायी मार्ग नसल्याने वाहतूक बंद आहे.

गडहिंग्लज तालुक्यातील  निलजी, नूल, येणेचवंडी, नंदनवाड प्रजिमा 86 मार्गावरील किमी -0/750 वरील निलजी बंधाऱ्यावर 3 फूट पाणी आल्याने निलजी, नूल मार्गे वाहतूक बंद असून प्रजिमा 80 वरुन दुंडगे- जरळी- मुगळी- नुल मार्गे पर्यायी वाहतूक सुरु आहे.

राधानगरी तालुक्यातील  आरे, सडोली खालसा, राशीवडे ब्रु., शिरगाव प्रजिमा क्रं. 35 मार्गावरील शिरगाव बंधाऱ्यावर 2 फूट पाणी असल्याने वाहतूक बंद असून तारळे व राशीवडे मार्गे पर्यायी वाहतूक सुरु आहे.

 पन्हाळा तालुक्यातील परखंदळे, आकुर्डे, हारपवडे, गवशी, धुंदवडे, जर्गी, गगनबावडा प्रजिमा क्रं. 39 मार्गावरील गोठे पुलावर 2 फुट पाणी आल्याने वाहतूक बंद असून मल्हार पेठे, सुळे, कोदवडे प्रजिमा 26 मार्गे पर्यायी वाहतूक सुरु आहे.

गगनबावडा तालुक्यातील शेनवडे, अंदूर, धुंदवडे, चौधरवाडी, म्हासुर्ली, कोते, चांदे, राशिवडे बु, परीते प्रजिमा क्रं. 34 मार्गावरील अंदूर बंधाऱ्यावर 2 फुट पाणी असल्याने अणदूर, मणदूर, वेतवडे, बालेवाडी प्रजिमा क्रं. 25 मार्गे वाहतूक सुरु आहे.

गगनबावडा तालुक्यातील बाजार भोगाव, किसरूळ, काळजवडे पोंबरे कोलीक, पडसाळी ते काजीर्डा घाटास मिळणारा जिल्हा हद्दीपर्यंत प्रजिमा क्र. 19 मार्गावरील मनवाडा बंधाऱ्यावर 2 फूट पाणी आल्याने व रस्त्यावर पाणी आल्याने वाहतुक बंद असून कोल्हापूर चिखली पाडळी येवलुज बाजारभोगाव मार्गे पर्यायी वाहतुक सुरु आहे.

चंदगड तालुक्यातील राजगोळी, कुदनूर, कालकुंद्री, कागणी, किणी, नागरदळे, कडलगे, ढोलगरवाडी, मांडेदुर्ग, कारवे रामा क्र. 180 ला मिळणारा रस्ता प्रजिमा क्र. 65 मार्गावरील मोरीवर 2 फूट पाणी आल्याने वाहतुक बंद असून प्रजिमा 65 ते ढोलगरवाडी, गौळवाडी ग्रा.मा. 34 मार्गे पर्यायी वाहतुक सुरू आहे. तसेच तळगुली सीडीवर्कवर 1 फूट पाणी, कूदनुर पुलावर 2 फूट पाणी, ढोलगरवाडी सीडीवर्कवर 1.6 फूट पाणी व मांडे दुर्गे सीडीवर्कवर 2 फूट पाणी आल्याने व पर्यायी मार्ग नसल्याने  वाहतूक बंद आहे.

करवीर तालुक्यातील बालिंगे, महेपाटी, बीड, शिरोली, तारळे खुर्द, कसबा तारळे, पिरळ, पडळी, कारीवडे दिगस, ओळवण प्र. जि. मा. 29 मार्गावरील शिरोली गावाजवळ मोरीवर पाणी असल्याने वाहतूक बंद असून शिरोली दुमाला, घानवडे हसुर दुमाला, सोनाळी ते चाफोडी मार्ग पर्यायी वाहतूक सुरू आहे. तसेच महे पुलावर 4 फुट पाणी असल्याने, 15/300 येथे रस्त्यावर पाणी आल्याने वाहतूक बंद असून महे गावापर्यंची वाहतूक बालिंगा पाडळी व कसबा बीड करीता कुडीत्रे फॅक्टरी सांगरुळ मार्गे पर्यायी वाहतूक सुरू आहे.

पन्हाळा तालुक्यातील कोपार्डे पडळ माजगाव पोर्ले प्र. जि. मा. 18 मार्गावरील माजगाव पुलावर 2 फुट पाणी असल्याने वाहतूक बंद असून कळे पुनाळ दिगवडे प्रजिमा क्र. 17 मार्गे  पर्यायी वाहतूक सुरू आहे.

चंदगड तालुक्यातील पाटणेफाटा, माणगाव, शिवणगे, निट्टूर कोवाड प्र. जि. मा. क्र. 67 मार्गावरील म्हाळेवाडी गावाजवळ पाणी निट्टुर गावाजवळ मोरीवर पाणी असल्याने वाहतूक बंद असून कोवाड, ढोलकरवाडी, गौळवाडी  मार्गे  पर्यायी वाहतूक सुरू आहे. तसेच  माणगाव के टी वीयर 1 फुट पाणी असल्याने वाहतूक बंद आहे.

शाहूवाडी तालुक्यातील डोणोली, जवळून, चरण, सैदापूर, सावर्डे, सातवे, मोहरे, कोडोली प्र. जि. मा. क्र. 6 मार्गावरील डोणोली गावाजवळ बंधाऱ्यावर पाणी असल्याने वाहतूक बंद असून थेरगाव, सातर्डे सातवे शिंदेवाडी व थेरगाव सावर्डे, सातवे मार्गे  पर्यायी वाहतूक सुरू आहे.

कागल तालुक्यातील बिद्री, सोनाळी, बस्तवडे प्र. जि. मा. क्र. 46 मार्गावरील बस्तवडे बंधाऱ्यावर 3 फुट पाणी असल्याने वाहतूक बंद असून इजिमा क्र. 189 अनुर ते बानगे व इजिमा क्र. 93 बानगे मार्ग पर्यायी वाहतूक सुरू आहे.

चंदगड तालुक्यातील पाटणे फाटा, पाटणे मोटणवाडी प्र. जि. मा. क्र. 76 मार्गावरील पाटणे पुलावर 2 फुट पाणी असल्याने पर्यायी मार्ग नसल्याने वाहतुक बंद आहे.

करवीर तालुक्यातील कुडित्रे, कोगे, महे, देवाळे, दिंडनेर्ली, नंदगाव प्र. क्र. 28 मार्गावरील कोगे बंधाऱ्यावर 3 फुट पाणी असल्याने वाहतूक बंद असून कुडीत्रे करिता गगनबावडा मार्गे व कोगे करिता बालिंगा पाडळी कोगे मार्गे  पर्यायी वाहतूक सुरू आहे. तसेच लहान पुलावर 3 फूट पाणी आल्याने कोल्हापूर, परिते मार्गे व बालिंगा, पाडळी, महे मार्गे पर्यायी वाहतुक सुरू आहे.

शाहूवाडी तालुक्यातील येळाणे, कोपार्डे, जवळून, शिरगांव, सौते, शिंपे, सुरुड ते सागाव जिल्हा हद्दीपर्यंत प्रजिमा क्रं. 4 मार्गावरील शिरगांव मठ ते सवतेमध्ये रस्त्यावर पाणी तसेच येळाणी ते कोपार्डे रस्त्यावर 2.5 फूट पाणी आल्याने वाहतूक बंद असून मलकापूर सावे बांबवडे सुरुड मार्गे  पर्यायी वाहतूक सुरू आहे.

कागल तालुक्यातील आलाबाद, दौलतवाडी, मुरगुड प्रजिमा क्रं. 50 मार्गावरील सर पिराजीराव तलावातील पाणी रस्त्यावर आल्याने वाहतूक बंद असून हासुर बोळावी ठाणेवाडी व देवगड, राधानगरी, मुरगड मार्गे पर्यायी वाहतूक सुरू आहे.

गडहिंग्लज तालुक्यातील जरळी, दुंडगे, हासूचंपू ते राज्य हद्दीपर्यंत प्रजिमा 80 मार्गावरील जरळी बंधाऱ्यावर 2 फुट पाणी असल्याने वाहतूक बंद असून गडहिंग्लज, आजरा, नेसरी, महागाव  मार्गे  पर्यायी वाहतूक सुरू आहे.

गडहिंग्लज तालुक्यातील हलकर्णी, बसर्गे प्रजिमा 57 मार्गावरील हलकर्णी cause way वर 9 इंच पाणी असल्याने वाहतूक बंद असून बसरगे येणेचवंडी, नंदनवाड, हलकर्णी  मार्गे  पर्यायी वाहतूक सुरू आहे.

करवीर तालुक्यातील कुडीत्रे, कोगे, महे, देवाळे, दिंडनेर्ली, नंदगाव प्रक्र. 28 मार्गावरील शेळकेवाडी गावाजवळ पाणी आल्याने व पर्यायी मार्ग नसल्याने वाहतुक बंद आहे.

गडहिंग्लज तालुक्यातील शृंगारवाडी, वाटंगी, अर्जुनवाडी, सांबरे, मलतवाडी, निटुर प्रजिमा क्र. 64 मार्गावरील कानडेवाडी बंधाऱ्यावर 2 फूट पाणी आल्याने वाहतुक बंद असून नेसरी, अडकूर मार्गे पर्यायी वाहतुक सुरू आहे.

हातकणंगले तालुक्यातील निलेवाडी, पारगाव रस्ता प्रजिमा क्र. 96 मार्गावरील निलेवाडी पुलावर 2 फूट पाणी आल्याने वाहतुक बंद असून वारणानगर चिकुर्डे मार्गे पर्यायी वाहतुक सुरू आहे.

पन्हाळा तालुक्यातील  केर्ली,जोतिबा रस्ता प्रजिमा क्र. 11 मार्गावर केर्ली जोतिबा रस्ता खचल्याने रस्ता बंद असून गायमुख वळण रस्त्यावरून पर्यायी वाहतुक सुरू आहे.

पन्हाळा तालुक्यातील कळे, पुनाळ, दिगवडे, कोतोली प्रजिमा क्र. 17 मार्गावरील कुशिरे, दिघवडे, माळवाडी रस्त्यावर 3 फूट पाणी आल्याने वाहतुक बंद असून रामा. क्र. 193 मार्गे पर्यायी वाहतुक सुरू आहे.

000000

 


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.