** जिल्हा माहिती कार्यालयाच्या संकेतस्थळावर आपले स्वागत ** बातम्या, लेख, पर्यटन विषयक माहिती, पत्रकारांसाठीच्या विविध योजना, लोकराज्यसह इतर **

Monday, August 10, 2020

आजअखेर 4603 जणांना डिस्चार्ज -डॉ. बी. सी. केम्पी पाटील

 


       कोल्हापूर,दि. 10 (जिल्हा माहिती कार्यालय) : आज संध्याकाळी 5 वाजेपर्यंत आरटीपीसीआर आणि सीबीएनएएटी चाचणीचे 1031 प्राप्त अहवालापैकी 597 निगेटिव्ह तर 432 अहवाल पॉझीटिव्ह आहेत. (2 अहवाल नाकारण्यात आले) अॅन्टीजेन टेस्टिंग चाचणीचे 509 प्राप्त अहवालापैकी निगेटिव्ह 477 तर 32 पॉझीटिव्ह (37 निगेटिव्ह अहवाल आरटीपीसीआर साठी तपासणीसाठी पाठविले), खासगी रुग्णालये/लॅब मधील 158 पॉझीटिव्ह आले असे एकूण 622 अहवाल पॉझीटिव्ह आहेत.

जिल्ह्यात आजअखेर एकूण 11061 पॉझीटिव्हपैकी 4603 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आजअखेर जिल्ह्यात एकूण 6156 पॉझीटिव्ह रुग्ण आहेत, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बी. सी. केम्पी-पाटील यांनी आज दिली.

आज संध्याकाळी 5 वाजेपर्यंत प्राप्त 622 पॉझीटिव्ह अहवालापैकी आजरा-4, भुदरगड-26, चंदगड-7, हातकणंगले- 82, कागल-18, करवीर- 83, पन्हाळा- 32, राधानगरी-3, शाहूवाडी-10, शिरोळ- 38, नगरपरिषद क्षेत्र- 155, कोल्हापूर महापालिका क्षेत्र-149 व इतर शहरे व राज्य 15 असा समावेश आहे.

आजअखेर तालुका, नपा आणि मनपा क्षेत्रनिहाय रुग्णांची संख्या पुढीलप्रमाणे - आजरा-219, भुदरगड- 282, चंदगड- 423 गडहिंग्लज- 309, गगनबावडा- 30, हातकणंगले-1123, कागल- 218, करवीर- 1193, पन्हाळा- 406, राधानगरी- 322, शाहूवाडी- 346, शिरोळ- 450, नगरपरिषद क्षेत्र-2342, कोल्हापूर महापालिका क्षेत्र-3216 असे एकूण 10879 आणि इतर जिल्हा व राज्यातील - 182 असे मिळून एकूण 11061 रुग्णांची आजअखेर जिल्ह्यात संख्या आहे.

            जिल्ह्यातील एकूण 11061 पॉझीटिव्ह रूग्णांपैकी 4603 रूग्णांना डिस्चार्ज मिळाला आहे. तर एकूण 302 जणांचा मृत्यू झाला असल्यामुळे आजअखेर उपचारार्थ दाखल झालेल्या जिल्ह्यातील रूग्णांची संख्या 6156 इतकी आहे.

000000

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.