इंडिया ई च्या Dictionary मध्ये जिमाका चा ब्लॉग

सोमवार, ३ ऑगस्ट, २०२०

कोरोना रुग्णांची अवाजवी बील आकारणी करणाऱ्या खासगी रुग्णालयांवर कारवाई - जिल्हाधिकरी दौलत देसाई


 

कोल्हापूर, दि. 3 (जिल्हा माहिती कार्यालय) : कोरोना रुग्णांच्या उपचाराची अवाजवी बील आकारणी करुन पिळवणूक करणाऱ्या खासगी रुग्णालयांवर निश्चित कारवाई केली जाईल. नोंदणी रद्द करण्याची कारवाईही केली जाईल, असा इशारा जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी आज दिला.

 जिल्हाधिकारी कार्यालयात श्री. देसाई पत्रकारांशी बोलत होते. यावेळी महापालिक आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल उपस्थित होते. जिल्हाधिकारी श्री. देसाई यावेळी म्हणाले, जिल्ह्यामध्ये कोव्हिड-19 प्रादूर्भाव वाढत आहे. दररोज 250 ते 300 रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे खासगी रुग्णालयांकडे कलही वाढत आहे. शहरातील 25 खासगी रुग्णालये सेवा देत आहेत. परंतु, काही रुग्णालयांकडून रुग्णांसाठी अवाजवी बील आकारणी केली जात आहे. अशावेळी या रुग्णांची पिळवणूक होत असल्याचे निदर्शनास येत आहे. यावर नियंत्रण ठेवण्यासाठी महापालिकास्तरावर प्रत्येक रुग्णालयासाठी लेखा परीक्षण अधिकारी नेमण्यात आला आहे. रुग्‍णांना दिलेले बील हे शासनाने ठरवून दिलेल्या नियमानुसार आहे की नाही, हे हा अधिकारी तपासणी करेल.

 योग्य बील असल्यास तेवढेच बील रुग्णालयाला द्यावे. उर्वरित बील रुग्णांनी देवू नये, असे सांगून जिल्हाधिकारी पुढे म्हणाले, रुग्णांनी त्यासाठी या लेखा परीक्षण अधिकाऱ्यांशी संपर्क करुन तक्रार करावी. अवाजवी बील आकारणी केल्याचे आढळल्यास अशा रुग्णालयांवर निश्चित कारवाई केली जाईल. रुग्णालयाची नोंदणी देखील रद्द केली जाईल, याची सर्व खासगी रुग्णालयांनी नोंद घ्यावी. अशीच कार्यपध्दती ग्रामीण भागात जिथे मोठी रुग्णालये आहेत, इचलकरंजी, गडहिंग्लज, जयसिंगपूर, शिरोळ या ठिकाणीही खासगी रुग्णालये अवाजवी दर आकारणी करत असतील तर तेथेही लेखा परीक्षण अधिकाऱ्यांची स्वतंत्र नेमणूक करुन या बिलांवर नियंत्रण ठेवले जाईल.

जिल्ह्यात कोव्हिड-19 चा प्रादूर्भाव वाढत असला तरी जवळपास 90 ते 95 टक्के रुग्णांना कोणतीही लक्षणे नसतात. अशा रुग्णांनी रुग्णालयाकडे न जाता, कोणाशी संपर्कात न येता घरात स्वतंत्र राहिल्यास, अशांसाठी जिल्हा परिषद, स्थानिक प्रशासन आणि जिल्हा प्रशासनामार्फत कोव्हिड किट दिले जाईल. या किटचा कसा वापर करायचा याचेही मार्गदर्शन केले जाईल. अशा रुग्णांनी स्वत:ला घरी विलगीकरण करावे. त्यामुळे कोव्हिड काळजी केंद्रावर भार येणार नाही. अशांसाठी नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र, प्राथमिक आरोग्य केंद्र यांच्याकडून योग्य तो वैद्यकीय सल्ला दिला जाईल. यामुळे रुग्णालयांवर येणारा भार कमी होण्यास मदत होईल, असेही ते म्हणाले.

कोव्हिड 19 च्या बीलांसाठी खासगी रुग्णालयांसाठी नियुक्त लेखाधिकारी

 

अ.   क्र

अधिकऱ्यांचे नाव

पदनाम

देणेत आलेले हास्पीटल

1

श्री. रा. बा. नागणे

लेखाधिकारी

 जि. प. कोल्हापूर

साई कार्डियाक सेंटर, राजारामपुरी 6 व गल्ली व गंगा प्रकाश हॉस्पीटल रंकाळा स्टँड, कोल्हापूर

2

श्रीमती रुपाली रोकडे

लेखाधिकारी

 जि. प. कोल्हापूर

मोरया हॉस्पीटल राजारामपुरी 9 वी गल्ली व सचिन सुपर स्पेशालिटी हॉस्पीटल राजारामपुरी 6 वी गल्ली, कोल्हापूर 

3

श्रीमती प्रिया देशमूख

लेखाधिकारी सर्व शिक्षा अभियान जि. प. कोल्हापूर

ॲपल सरस्वती हॉस्पीटल कदमवाडी.

4

श्री. संजय कुभार

लेखाधिकारी स्वच्छता व पाणी पुरवठा अभियान जि. प. कोल्हापूर

केळवकर हॉस्पीटल, ताराबाई पार्क व टूलीप हॉस्पीटल, कदमवाडी, कोल्हापूर

5

श्रीमती वर्षा परीट

लेखाधिकारी शा. पो. आ.

जि. प. कोल्हापूर

व्हिनस हॉस्पीटल नागाळा पार्क, कोल्हापूर

6

श्री. स्वप्नील हिरुगडे

जि. अ. कृ. अ. कोल्हापूर

डायमंड सुपर स्पेशालिटी, नागाळा पार्क व केपीसी हॉस्पीटल, महाराणा प्रताप चौक, कोल्हापूर

7

श्री. रणजीत झपाटे

उच्च शिक्षण अनुदान उपसंचालक कार्यालय, हत्ती महल, कोल्हापूर

अथायू हॉस्पीटल उजळाईवाडी व शाहूपुरी,

8

श्री. अजित शिंदे

लेखा परीक्षण पथक

उपसंचालक कार्यालय,

हत्ती महल कोल्हापूर

सिध्दी विनायक नर्सिंगहोम, टाकाळा व व्येंकटेश्वरा हॉस्पीटल, रविवार पेठ, कोल्हापूर

9

श्रीमती अस्मिता मोटे

लेखाधिकारी

उपसंचालक कार्यालय,

हत्ती महल कोल्हापूर

अंतरंग हॉस्पीटल, नागाळा पार्क, कोल्हापूर

10

श्रीमती अमृता कुंभार

 लेखाधिकारी मृद व जलसंधारण कार्यालय, कोल्हापूर

सुर्या हॉस्पीटल, दसरा चौक, कोल्हापूर

11

श्री. सुनिल रेणके

लेखाधिकारी महाराष्ट्र राज्य व माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, कोल्हापूर

मंगलमुर्ती हॉस्पीटल शास्त्रीनगर, कोल्हापूर

12

श्रीमती अश्विनी जाधव

लेखाधिकारी विभागीय सहसंचालक कृषी विभाग, कोल्हापूर

कृष्णा हॉस्पीटल, संभाजीनगर, कोल्हापूर

13

श्री. सुनिल चव्हाण

लेखाधिकारी विभागीय उप आयुक्त कार्यालय, उत्पादन शुल्क, कोल्हापूर

मेट्रो हॉस्पीटल शाहूपुरी 2 री गल्ली व अथायु हॉस्पीटल शाहूपुरी 2 री गल्ली, कोल्हापूर

 

 

 

 

14

श्री. सागर वाळवेकर

लेखाधिकारी स्थानिक लेखा कोल्हापूर

प्लस हॉस्पीटल कदमवाडी व आर्थोपेडीक हॉस्पीटल कदमवाडी, कोल्हापूर

15

श्री. बाबा जाधव

लेखाधिकारी 

प्रादेशिक परिवहन कार्यालय, कोल्हापूर

सनराईज हॉस्पीटल शिवाजीपार्क, व स्वास्तीक हॉस्पीटल, शिवाजीपार्क, कोल्हापूर

16

श्री. राम पाटील

लेखाधिकारी

कृषी महाविद्यालय,  कोल्हापूर

सिध्दीविनायक हार्ट हॉस्पीटल, शास्त्रीनगर, कोल्हापूर

17

श्री. मिलींद पाटील

लेखाधिकारी,

जिल्हाधिकारी कार्यालय,

 कोल्हापूर

नॉथ सुपर स्टार स्पेशालिटी भक्ती पुजा नगर व लाईफ लाईन हॉस्पीटल भक्ती पुजा नगर, कोल्हापूर

18

श्री. प्रशांत पाटील

लेखाधिकारी,

जिल्हाधिकारी कार्यालय,

कोल्हापूर

कपिलेश्वर हॉस्पीटल दुधाळी, कोल्हापूर

19

श्रीमती दुर्गाली थोरात

लेखाधिकारी,

जिल्हाधिकारी कार्यालय,

कोल्हापूर

अपेक्स हॉस्पीटल,

शिवाजी पार्क, कोल्हापूर

20

श्रीमती शोभा घाटगे

वरिष्ठ लेखा परिक्षक,

को.म.न.पा.

जानकी नर्सिंग होम राजारामपुरी,

3 री गल्ली व सीटी हॉस्पीटल, कोल्हापूर

21

श्री. दिपक कुंभार

वरिष्ठ लेखा परिक्षक,

को.म.न.पा.

ॲस्टर हॉस्पीटल, शास्त्रीनगर, कोल्हापूर

 

श्री. धनंजय आंधळे, मुख्य लेखा परिक्षक, महानगरपालिका, कोल्हापूर हे संनियंत्रण अधिकारी म्हणून काम पाहतील. मोबाईल क्रमांक 9421591999

 

 


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.