** जिल्हा माहिती कार्यालयाच्या संकेतस्थळावर आपले स्वागत ** बातम्या, लेख, पर्यटन विषयक माहिती, पत्रकारांसाठीच्या विविध योजना, लोकराज्यसह इतर **

Monday, August 3, 2020

आजअखेर 3270 जणांना डिस्चार्ज डॉ. बी. सी. केम्पी पाटील


       कोल्हापूर,दि. 3 (जिल्हा माहिती कार्यालय) : आज संध्याकाळी 5 वाजेपर्यंत 1625 प्राप्त अहवालापैकी 1228 निगेटिव्ह तर 321 अहवाल पॉझीटिव्ह आहेत. (63 अहवाल प्रलंबित, 2 जणांचा दुसराही अहवाल पॉझीटिव्ह, 11 अहवाल नाकारण्यात आले) अँन्टीजेन टेस्टिंग चाचणीचे 42 प्राप्त अहवालापैकी 32 निगेटिव्ह, 10 पॉझीटिव्ह तर खासगी रुग्णालये/लॅब मधील 116 पॉझीटिव्ह असे, एकूण 447 अहवाल पॉझीटिव्ह आहेत.

जिल्ह्यात आजअखेर एकूण 7352 पॉझीटिव्हपैकी 3270 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आजअखेर जिल्ह्यात एकूण 3876 पॉझीटिव्ह रुग्ण आहेत, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बी. सी. केम्पी-पाटील यांनी आज दिली.

आज संध्याकाळी 5 वाजेपर्यंत प्राप्त 447 पॉझीटिव्ह अहवालापैकी आजरा- 4, भुदरगड- 1, चंदगड- 4, गडहिंग्लज-2, गगनबावडा-3, हातकणंगले- 56, कागल-8, करवीर- 45, पन्हाळा- 23, राधानगरी- 13, शाहूवाडी- 9, शिरोळ- 19, नगरपरिषद क्षेत्र- 78, कोल्हापूर महापालिका क्षेत्र-178 व इतर जिल्हा व राज्यातील - 4 असा समावेश आहे.

आजअखेर तालुका, नपा आणि मनपा क्षेत्रनिहाय रुग्णांची संख्या पुढीलप्रमाणे - आजरा-156, भुदरगड- 153, चंदगड- 386, गडहिंग्लज- 251, गगनबावडा- 16, हातकणंगले- 650, कागल- 149, करवीर- 833, पन्हाळा- 316, राधानगरी- 248, शाहूवाडी- 278, शिरोळ- 276, नगरपरिषद क्षेत्र- 1488, कोल्हापूर महापालिका क्षेत्र-2047 असे एकूण 7247 आणि इतर जिल्हा व राज्यातील - 105 असे मिळून एकूण 7352 रुग्णांची आजअखेर जिल्ह्यात संख्या आहे.

            जिल्ह्यातील एकूण 7352 पॉझीटिव्ह रूग्णांपैकी 3270 रूग्णांना डिस्चार्ज मिळाला आहे. तर एकूण 206 जणांचा मृत्यू झाला असल्यामुळे आजअखेर उपचारार्थ दाखल झालेल्या जिल्ह्यातील रूग्णांची संख्या 3876 इतकी आहे.

000000

 

 

 


No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.