** जिल्हा माहिती कार्यालयाच्या संकेतस्थळावर आपले स्वागत ** बातम्या, लेख, पर्यटन विषयक माहिती, पत्रकारांसाठीच्या विविध योजना, लोकराज्यसह इतर **

Tuesday, August 6, 2019

एनडीआरएफसह कोल्हापूरमध्ये लष्कराचे पथक दाखल -जिल्हाधिकारी दौलत देसाई कोल्हापूर दि. 6 (जिमाका):- आज आणखी एक एनडीआरएफचे जादा पथक त्याचबरोबर लष्कराचे पथक कोल्हापूरमध्ये दाखल झाले आहे. उद्या पहाटेपासून जिल्ह्यातील विशेषत: प्रयाग चिखली या पूरग्रस्त भागात स्थलांतरास सुरुवात होणार आहे. खराब वातावरणामुळे नेव्हीचे विमान आणि गोवा कोस्ट गार्डचे हेलिकॉप्टर कोल्हापूरमध्ये पोहचू शकले नाही. अशी माहिती जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिली. आज दिवसभरामध्ये प्रयाग चिखली, आंबेवाडीसह शिरोळ तालुक्यातील विविध गावांमधून सुमारे बाराशे व्यक्तींना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. असे सांगून जिल्हाधिकारी श्री. देसाई पुढे म्हणाले, एनडीआरएफ आणि लष्कर असे 106 जणांचे पथक कोल्हापूरजवळ पोहचले आहे. महामार्गावर आलेल्या पाण्यामुळे या दोन्ही पथकांना पुढे जाता आले नाही. उद्या सकाळी 5 वाजल्यापासून ही दोन्ही पथके पूरग्रस्त भागामध्ये जाणार आहेत. याबाबत कर्नल अनुराग सक्सेना, एस. वाय. शिंदे यांच्याशी चर्चा झाली आहे. नेव्हीच्या माध्यमातूनही 5 बोटी आणि पथके उपलब्ध करुन देण्यात येणार होती. मुंबईहून विमान कोल्हापूरकडे येण्यासाठी निघाले होते परंतु खराब वातावरणामुळे माघारी जावे लागले. उद्या एअरफोर्सच्या विमानाने हे पथक कोल्हापूरमध्ये दाखल होईल. उद्या पूरग्रस्तांना सुरक्षितस्थळी हलविण्याबरोबरच त्यांना जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करण्यात येईल. कोस्टगार्डचे एक हेलिकॉप्टर आज गोव्याहून कोल्हापूरकडे निघाले होते, ते रत्नागिरीपर्यंत पोहचले परंतु खराब वातावरणामुळे पुढे येऊ शकले नाही. हे हेलिकॉप्टरही एअरलिफ्टींगसाठी उद्या कोल्हापूरमध्ये येईल अशी माहितीही श्री. देसाई यांनी दिली. आज दिवसभरामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री चंद्रकांत पाटील, जलसंपदामंत्री गिरीश महाजन, मुख्य सचिव, सचिव मदत व पुनर्वसन, पुणे विभागीय आयुक्त या सर्वांनी दूरध्वनीवरुन कोल्हापूर जिल्ह्यातील पूरपरिस्थितीचा आढावा घेतला आहे असेही त्यांनी सांगितले. ००००००


एनडीआरएफसह कोल्हापूरमध्ये लष्कराचे पथक दाखल
                                       -जिल्हाधिकारी दौलत देसाई
            कोल्हापूर दि. 6 (जिमाका):- आज आणखी एक एनडीआरएफचे जादा पथक त्याचबरोबर लष्कराचे पथक कोल्हापूरमध्ये दाखल झाले आहे. उद्या पहाटेपासून जिल्ह्यातील विशेषत: प्रयाग चिखली या पूरग्रस्त भागात स्थलांतरास सुरुवात होणार आहे. खराब वातावरणामुळे नेव्हीचे विमान आणि गोवा कोस्ट गार्डचे हेलिकॉप्टर कोल्हापूरमध्ये पोहचू शकले नाही. अशी माहिती जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिली.
            आज दिवसभरामध्ये प्रयाग चिखली, आंबेवाडीसह शिरोळ तालुक्यातील विविध गावांमधून सुमारे बाराशे व्यक्तींना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. असे सांगून जिल्हाधिकारी श्री. देसाई पुढे म्हणाले, एनडीआरएफ आणि लष्कर  असे 106 जणांचे पथक कोल्हापूरजवळ पोहचले आहे. महामार्गावर आलेल्या पाण्यामुळे या दोन्ही पथकांना पुढे जाता आले नाही. उद्या सकाळी 5 वाजल्यापासून ही दोन्ही पथके पूरग्रस्त भागामध्ये जाणार आहेत. याबाबत कर्नल अनुराग सक्सेना, एस. वाय. शिंदे यांच्याशी चर्चा झाली आहे.  
            नेव्हीच्या माध्यमातूनही 5 बोटी आणि पथके उपलब्ध करुन देण्यात येणार होती. मुंबईहून विमान कोल्हापूरकडे येण्यासाठी निघाले होते परंतु खराब वातावरणामुळे माघारी जावे लागले. उद्या एअरफोर्सच्या विमानाने हे पथक कोल्हापूरमध्ये दाखल होईल. उद्या पूरग्रस्तांना सुरक्षितस्थळी हलविण्याबरोबरच त्यांना जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करण्यात येईल. कोस्टगार्डचे एक हेलिकॉप्टर आज गोव्याहून कोल्हापूरकडे निघाले होते, ते रत्नागिरीपर्यंत पोहचले परंतु खराब वातावरणामुळे पुढे येऊ शकले नाही. हे हेलिकॉप्टरही एअरलिफ्टींगसाठी उद्या कोल्हापूरमध्ये येईल अशी माहितीही श्री. देसाई यांनी ‍दिली.
            आज दिवसभरामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री चंद्रकांत पाटील, जलसंपदामंत्री गिरीश महाजन, मुख्य सचिव, सचिव मदत व पुनर्वसन, पुणे विभागीय आयुक्त या सर्वांनी दूरध्वनीवरुन कोल्हापूर जिल्ह्यातील पूरपरिस्थितीचा आढावा घेतला आहे असेही त्यांनी सांगितले.
००००००

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.