इंडिया ई च्या Dictionary मध्ये जिमाका चा ब्लॉग

शुक्रवार, ७ ऑगस्ट, २०२०

जिल्ह्यातील 23 गावांमधील 1878 कुटुंबातील 5561 व्यक्तींचे स्थलांतर -जिल्हाधिकारी दौलत देसाई

 


 

 कोल्हापूर, दि. 7 (जिल्हा माहिती कार्यालय):  जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे 23 गावांमधील 1878 कुटुंबातील 5561 व्यक्तींचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिली. 

       स्थलांतरीत कुटुंबांची तालुकानिहाय माहिती पुढीलप्रमाणे गडहिंग्लज बाधित गावांची संख्या 2, 5 कुटुंबातील 21 व्यक्ती, 14 जनावरे. आजरा 1, एका कुटुंबातील 9 व्यक्ती, पन्हाळा- बाधित 2 गावातील 3 कुटुंबातील 14 व्यक्ती एका जनावरासह स्थलांतर झाले आहे. करवीर- 3 बाधित गावांमध्ये 1701 कुटुंबातील 4861 व्यक्ती आणि 1038 जनावरे स्थलांतरीत करण्यात आले आहेत.  गगनबावडा -बाधित 8 गावांमधील 21 कुटुंबातील 107 व्यक्तींचे आणि 32 जनावरांचे स्थलांतर झाले आहे. चंदगड-  बाधित 6 गावातील 97 कुटुंबातील 377 व्यक्ती 47 जनावरांचे स्थलांतर करण्यात आले आहे. कोल्हापूर महानगरपालिका क्षेत्रातील 50 कुटूंबातील 172 नागरिकांचे स्थलांतरीत करण्यात आले आहे.

            अशा जिल्ह्यातील एकूण 23 गावांमधील 1878 कुटुंबातील 5561 व्यक्तींना आणि 1132 जनावरांना  सुरक्षित ठिकाणी स्थलांतरीत करण्यात आले आहे.

 

जिल्ह्यातील 6 संक्रमण शिबीरात 438 जण

पुरबाधीतासाठी जिल्ह्यामध्ये 6 ठिकाणी उघडण्यात आलेल्या संक्रमण शिबीरात 168 पुरुष 142 महिला तर 128 लहान मुले अशा 438 जणांचा समावेश आहे. कोल्हापूर शहरात उघडण्यात आलेल्या 1 शिबीरात 172, गडहिंग्लज मधील शिबीरात 18 आणि चंदगड मधील 4 ठिकाणच्या शिबीरात 248 जणांचा समावेश आहे.

0000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.