कोल्हापूर, दि. 9 (जिल्हा माहिती कार्यालय) :
जिल्ह्यातील राधानगरी धरणात 233.883 दलघमी पाणीसाठा आहे. आज सायंकाळी 4 वा. च्या अहवालानुसार राधानगरी धरणाच्या विद्युत विमोचकातून
1400 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे.
पंचगंगा
नदीवरील- शिंगणापूर, राजाराम, सुर्वे, रूई, इचलकरंजी,
तेरवाड व शिरोळ, भोगावती नदीवरील-
राशिवडे, हळदी, शिरगांव, सरकारी कोगे, खडक कोगे व तारळे. तुळशी नदीवरील बीड व आरे. कासारी
नदीवरील- कुंभेवाडी, कांटे, करंजफेण, पेंडाखळे, बाजारभोगाव, वालोली, पुनाळ
तिरपन, ठाणे आळवे व यवलूज. कुंभी नदीवरील- शेनवडे, वेतवडे, सांगरूळ व
कळे. धामणी नदीवरील- सुळे, आंबर्डे,
पनोरे. वारणा नदीवरील-चिंचोली, माणगांव,
कोडोली, खोची, तांदूळवाडी, मांगलेसावर्डे, शिगांव, चावरे व दानोळी. कडवी नदीवरील- सवतेसावर्डे, शिरगांव,
सरूडपाटणे, बालूर, भोसलेवाडी, येलूर व कोपार्डे. दुधगंगा नदीवरील-सिध्दनेर्ली, बाचणी, सुळकूड, दत्तवाड, कसबा वाळवे व
तुरंबे. वेदगंगा नदीवरील- कुरणी,
सुरूपली, बस्तवडे, चिखली,निळपण व वाघापूर. हिरण्यकेशी
नदीवरील-खणदाळ व निलजी. घटप्रभा
नदीवरील- कानडे सावर्डे, आडकूर व तारेवाडी. ताम्रपर्णी नदीवरील-कुर्तनवाडी, चंदगड, कोवाड. असे एकूण 67 बंधारे पाण्याखाली आहेत.
तसेच बंधाऱ्यांची पाणी पातळी
पुढीलप्रमाणे आहे. राजाराम 42.8 फूट, तेरवाड 58.6 फूट, शिरोळ 54.9 फूट, नृसिंहवाडी
54.6 फूट अशी आहे.
0000000
No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.