कोल्हापूर,दि. 9 (जिल्हा माहिती कार्यालय) : आज
संध्याकाळी 5 वाजेपर्यंत आरटीपीसीआर आणि सीबीएनएएटी चाचणीचे 862 प्राप्त
अहवालापैकी 651 निगेटिव्ह तर 124 अहवाल पॉझीटिव्ह आहेत. (79 अहवाल प्रलंबित, 8
अहवाल नाकारण्यात आले) अॅन्टीजेन टेस्टिंग चाचणीचे 747 प्राप्त अहवालापैकी
निगेटिव्ह 551 तर 196 पॉझीटिव्ह (6 निगेटिव्ह अहवाल आरटीपीसीआर साठी तपासणीसाठी
पाठविले), खासगी रुग्णालये/लॅब मधील 128 पॉझीटिव्ह आले असे एकूण 448 अहवाल
पॉझीटिव्ह आहेत.
जिल्ह्यात आजअखेर एकूण 10439 पॉझीटिव्हपैकी 4337
जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आजअखेर जिल्ह्यात एकूण 5820 पॉझीटिव्ह रुग्ण
आहेत, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बी. सी. केम्पी-पाटील यांनी आज दिली.
आज संध्याकाळी 5 वाजेपर्यंत प्राप्त 448
पॉझीटिव्ह अहवालापैकी आजरा-15 भुदरगड-3, चंदगड-2, गडहिंग्लज-4, हातकणंगले- 80,
कागल-1 करवीर- 42, पन्हाळा- 3, राधानगरी-7, शिरोळ- 17, नगरपरिषद क्षेत्र- 104,
कोल्हापूर महापालिका क्षेत्र-154 व इतर शहरे व राज्य 16 असा समावेश आहे.
आजअखेर तालुका, नपा आणि मनपा क्षेत्रनिहाय रुग्णांची संख्या
पुढीलप्रमाणे - आजरा-215, भुदरगड- 256, चंदगड- 416 गडहिंग्लज- 309, गगनबावडा- 30,
हातकणंगले-1041, कागल- 200, करवीर- 1110, पन्हाळा- 374, राधानगरी- 319, शाहूवाडी-
336, शिरोळ- 412, नगरपरिषद क्षेत्र-2187, कोल्हापूर महापालिका क्षेत्र-3067 असे
एकूण 10272 आणि इतर
जिल्हा व राज्यातील - 167 असे मिळून एकूण 10439 रुग्णांची आजअखेर जिल्ह्यात संख्या
आहे.
जिल्ह्यातील एकूण 10439 पॉझीटिव्ह रूग्णांपैकी 4337
रूग्णांना डिस्चार्ज मिळाला आहे. तर एकूण 282 जणांचा मृत्यू झाला असल्यामुळे
आजअखेर उपचारार्थ दाखल झालेल्या जिल्ह्यातील रूग्णांची संख्या 5820 इतकी आहे.
000000
No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.