** जिल्हा माहिती कार्यालयाच्या संकेतस्थळावर आपले स्वागत ** बातम्या, लेख, पर्यटन विषयक माहिती, पत्रकारांसाठीच्या विविध योजना, लोकराज्यसह इतर **

Monday, August 10, 2020

जिल्ह्यातील राज्य व प्रमुख मार्ग बंद; पर्यायी मार्गाने वाहतूक सुरु

 


 

कोल्हापूर, दि. 10 (जिल्हा माहिती कार्यालय): जिल्ह्यात झालेल्या पावसामुळे जिल्ह्यातील राज्यमार्ग व प्रमुख जिल्हा मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत. पर्यायी मार्गाने वाहतूक वळविण्यात आली असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाचे सहाय्यक अधीक्षक अभियंता श्रीधर घाटगे यांनी दिली.

करवीर तालुक्यातील शिंगणापूर रामा-194 तसेच शिंगणापूर केटीवेअर रस्त्यावर पाणी आल्याने वाहतूक बंद, चिखली ते राष्ट्रीय महामार्ग पाणी आल्याने वाहतूक बंद.  चिखली गावाच्या कमानीजवळ पाणी व प्रयाग पुल ते वरणगे रस्त्यावर पुलावर पाणी आल्याने वाहतूक बंद, वरणगे, पाडळी, यवलुज, खुपिरे मार्गे वाहतुक सुरू. बाचणी बंधाऱ्यावर पाणी आल्याने वाहतूक बंद, कसबा बीड, घानवडे मार्गे वाहतूक सुरू, शिरोली गावाजवळ मोरीवर पाणी आल्याने शिरोली, दुमाला, घानवडे, हसूर, दुमाला, सोनाळी ते चाफोडी मार्गे वाहतूक सुरू, महे पुलावर पाणी आल्याने महे गावापर्यंतची वाहतूक बालिंगा पाडळी व कसबा बीड करिता कुडित्रे कारखाना सांगरूळ मार्गे वाहतूक सुरू, कोगे बंधाऱ्यावर पाणी आल्याने कुडित्रे करिता गगनबावडा मार्गे व कोगे करिता बालिंगा पाडळी कोगे मार्गे वाहतुक सुरू, लहान पुलावर पाणी आल्याने कोल्हापूर परिते मार्गे व बालिंगे पाडळी महे मार्गे वाहतुक सुरू, शेळकेवाडी गावाजवळ पाणी आल्याने वाहतूक बंद.

गडहिंग्लज तालुक्यातील  निलजी बंधाऱ्यावर पाणी आल्याने दुंडगे, जरळी, मुंगळी, नूल मार्गे वाहतुक सुरू.  

हातकणंगले तालुक्यातील ऐतवडे पुलावर पाणी आल्याने एकेरी वाहतूक सुरु. रांगोळी ते इचलकरंजी रस्त्यावर पाणी आल्याने जंगमवाडी, बोरगाव, इचलकरंजी अशी वाहतुक वळविण्यात आली आहे. इचलकरंजी नवीन पुलावरुन वाहतूक सुरू. माणकापूर इचलकंरजी दरम्यान पाणी आल्याने माणकापूर शिवनाकवाडीमार्गे वाहतूक सुरू, निलेवाडी पुलावर पाणी आल्याने वारणानगर चिकुर्डे मार्ग वाहतूक सुरु.

गगनबावडा तालुक्यातील मनवाडा बंधाऱ्यावर पाणी आल्याने कोल्हापूर चिखली, पाडळी, येवलुज, बाजारभोगाव मार्गे वाहतूक सुरु.

शिरोळ तालुक्यातील शिरढोण पुलावर पाणी आल्याने नांदणी जयसिंगपूर मार्गे वाहतूक सुरु. धरणगुत्ती गावाजवळ पाणी आल्याने जयसिंगपूर मार्गे वाहतूक सुरू.

राधानगरी तालुक्यातील शिरगाव बंधाऱ्यावर पाणी आल्याने तारळे, राशिवडे  मार्गे वाहतूक सुरु.

कागल तालुक्यातील बस्तवडे बंधाऱ्यावर पाणी आल्याने अनुर ते बानगे मार्गे वाहतूक सुरु. सर पिराजीराव तलावातील पाणी रस्त्यावर आल्याने हासुर बोळावी, ठाणेवाडी व देवगड, राधानगरी, मुरगुड मार्गे वाहतूक सुरु. कुरकली पुलावर पाणी आल्याने कोल्हापूर कुरुकली व हासुर करिता हळदी सडोली खालसा मार्गे वाहतूक सुरु. चिखली गावाजवळ रस्त्यावर पाणी आल्याने कौलगे हमीदवाडा खडकेवाडा मार्गे वाहतूक सुरु.

पन्हाळा तालुक्यातील गोठे पुलावर पाणी आल्याने मल्हार पेठ, सुळे, कोदवडे मार्गे वाहतूक सुरु. माजगाव पुलावर पाणी आल्याने कळे, पुनाळ, दिगवडे मार्गे वाहतूक सुरू. केर्ली जोतिबा रस्ता खचल्याने गायमुख वळण रस्त्यावरून मार्गे वाहतूक सुरू.

00000

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.