** जिल्हा माहिती कार्यालयाच्या संकेतस्थळावर आपले स्वागत ** बातम्या, लेख, पर्यटन विषयक माहिती, पत्रकारांसाठीच्या विविध योजना, लोकराज्यसह इतर **

Monday, August 10, 2020

राधानगरीतून 1400 तर अलमट्टीतून 120000 क्युसेक विसर्ग सुरू

 


 

            कोल्हापूर, दि. 10 (जिल्हा माहिती कार्यालय) :  राधानगरी धरणात 235.80 दलघमी पाणीसाठा आहे. आज सकाळी 7 वा. च्या अहवालानुसार राधानगरी धरणाच्या विद्युत विमोचकातून 1400 तर अलमट्टी धरणातून 120000 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. जांबरे मध्यम प्रकल्प व जंगमहट्टी मध्यम प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरलेला आहे.

पंचगंगा नदीवरील-  शिंगणापूर, राजाराम, सुर्वे, रूई, इचलकरंजी, तेरवाड व शिरोळ, भोगावती नदीवरील- राशिवडे, हळदी, सरकारी कोगे व खडक कोगे. तुळशी नदीवरील बीड व आरे. कासारी नदीवरील- कुंभेवाडी, कांटे, करंजफेण, पेंडाखळे, बाजारभोगाव, वालोली, पुनाळ तिरपन, ठाणे आळवे व यवलूज.  कुंभी नदीवरील- शेनवडे, सांगरूळ व कळे. वारणा नदीवरील-चिंचोली, माणगांव, कोडोली व तांदूळवाडी, कडवी नदीवरील- सवतेसावर्डे, शिरगांव, सरूडपाटणे, वालूर, भोसलेवाडी, येलूर व कोपार्डे. दुधगंगा नदीवरील-सिध्दनेर्ली, बाचणी, सुळकूड, दत्तवाड, कसबा वाळवे व तुरंबे. वेदगंगा नदीवरील- कुरणी, सुरूपली, बस्तवडे व चिखली, घटप्रभा नदीवरील- कानडे सावर्डे, आडकूर व तारेवाडी असे एकूण 49 बंधारे पाण्याखाली आहेत. नजिकच्या कोयना धरणात 74.30 टीएमसी तर अल्लमट्टी धरणात 92.593 टीएमसी इतका पाणीसाठा आहे.

जिल्ह्यातील धरणांमध्ये पुढीलप्रमाणे पाणीसाठा आहे. तुळशी 80.37 दलघमी, वारणा 834.95 दलघमी, दूधगंगा 620.84 दलघमी, कासारी 65.97 दलघमी, कडवी 62.18 दलघमी, कुंभी 62.11 दलघमी, पाटगाव 96.68 दलघमी, चिकोत्रा 29.65 दलघमी, चित्री 49.264 दलघमी, जंगमहट्टी 34.650 दलघमी, घटप्रभा  44.170  दलघमी, जांबरे 23.230 दलघमी, कोदे (ल पा) 6.060 दलघमी असा आहे.

            तसेच बंधाऱ्यांची पाणी पातळी पुढीलप्रमाणे आहे. राजाराम 41.4 फूट, सुर्वे 39.10 फूट, रुई 70.9 फूट, इचलकरंजी 66.3 फूट, तेरवाड 58 फूट, शिरोळ 53.6 फूट, नृसिंहवाडी 52.6 फूट, राजापूर 41 फूट तर नजीकच्या सांगली 18  फूट व अंकली 25.7 फूट अशी आहे.

00000

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.