** जिल्हा माहिती कार्यालयाच्या संकेतस्थळावर आपले स्वागत ** बातम्या, लेख, पर्यटन विषयक माहिती, पत्रकारांसाठीच्या विविध योजना, लोकराज्यसह इतर **

Sunday, August 9, 2020

रक्तपेढ्यांनी रक्तदान शिबीरांचे आयोजन करावे -सह आयुक्त एस.बी.पाटील

 

रक्तपेढ्यांनी रक्तदान शिबीरांचे आयोजन करावे

-सह आयुक्त एस.बी.पाटील

कोल्हापूर, दि. 9 (जिल्हा माहिती कार्यालय): रक्ताचा तुटवडा भासू लागल्याने जिल्ह्यातील प्रत्येक रक्तपेढ्यांनी किमान 3 ते 5 रक्तदान शिबीरांचे आयोजन करावे, अशी सूचना पुणे विभागाचे अन्न औषध प्रशासन सह आयुक्त एस.बी. पाटील यांनी केली आहे.

कोव्हिड 19 च्या परिस्थितीत रूग्णसंख्या वाढत असल्याने रूग्णांना आवश्यक रक्त व रक्तघटक तात्काळ मिळणे अत्यंत गरजेचे आहे. यापूर्वी दिलेल्या सूचनांचे पालन करुन तात्काळ रक्तदान शिबीरांचे आयोजन करावे, असे सर्व रक्तपेढ्यांना पाठवण्यात आलेल्या पत्रात श्री. पाटील यांनी म्हटले आहे.

0000000

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.