इंडिया ई च्या Dictionary मध्ये जिमाका चा ब्लॉग

गुरुवार, ६ ऑगस्ट, २०२०

कोयनेतून विसर्ग करण्यापूर्वी पूर्व सूचना दिली जाईल - कार्यकारी अभियंता कुमार पाटील


 

            कोल्हापूर, दि. 5 (जि.मा.का.) :  आज संध्याकाळी 6 वाजता कोयना धरणामध्ये 67.27 टीएमसी पाणीसाठा आहे. धरण परिचलन सूची नुसार कोयना धरणातील पाणीसाठा 80 टीएमसीच्या वर गेल्या नंतरच कोयना धरणातून कोयना नदी मध्ये विसर्ग सोडण्याचा निर्णय घेतला जाईल. सध्या गेल्या दोन दिवसांच्या तुलनेत पाऊस व पाण्याची आवक कमी आहे.  विसर्गाबाबत प्रशासन व प्रसार माध्यमे यांना पूर्व सूचना दिली जाईल अशी माहिती कोयना सिंचन विभागाचे कार्यकारी अभियंता कुमार पाटील यांनी दिली.

0 0 0 0 0


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.