इंडिया ई च्या Dictionary मध्ये जिमाका चा ब्लॉग

गुरुवार, ६ ऑगस्ट, २०२०

रुग्णांना प्रथम दाखल करुन उपचार सुरु करावेत - पालकमंत्री सतेज पाटील


 




          कोल्हापूर, दि. 5 (जि.मा.का.) : सीपीआरमध्ये येणाऱ्या कोरोना रुग्णांना प्रथम दाखल करुन उपचार सुरु करावेत, अशी सूचना पालकमंत्री सतेज पाटील यांनी आज केली.

          पालकमंत्री श्री. पाटील यांनी आज सायंकाळी सीपीआर रुग्णालयाला भेट देऊन व्यवस्थेबाबत पाहणी केली. यावेळी जिल्हाधिकारी दौलत देसाई, अधिष्ठाता डॉ चंद्रकांत मस्के, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. बी.सी.केम्पीपाटील, डॉ. अनिता सैबन्नावर उपस्थित होते.

          कोरोना रुग्णांची सद्यस्थिती आणि नियोजन याबाबत पालकमंत्र्यांनी माहिती घेतली. सीपीआर रुग्णालयामध्ये सध्या एकूण ४०० बेड्सची व्यवस्था आहे, त्यामध्ये ऑक्सिजन १०४ बेड्स आहेत. आज ४० ऑक्सिजन बेड्स नव्याने उपलब्ध करण्यात आले असून येत्या ४ ते ५ दिवसांमध्ये अजून ८० ऑक्सिजन बेड्स उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.  त्याचबरोबर आपत्कालीन वेळेसाठी रुग्णांसाठी ८ बेड्स राखीव आहेत.  उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांना रुग्णालयातील राखीव बेडवर दाखल करून तात्काळ उपचार सुरु करावेत. त्यानंतर त्या रुग्णांना उपलब्ध बेडसाठी संदर्भीत करावे, अशी सूचना रुग्णालय प्रशासनाला पालकमंत्र्यांनी यावेळी केली.

0 0 0 0 0 0 0


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.