कोल्हापूर, दि. 5 (जिल्हा माहिती कार्यालय) : ग्रामीण भागातील
जनतेला पोस्टाच्या माध्यमातून जास्तीत-जास्त बँकिंग सुविधा मिळाव्यात, पोस्टाच्या ग्राहकांना आर्थिक लाभाच्या विविध योजनांचा थेट फायदा मिळावा या हेतुने व कोविड-19 च्या परिस्थितीत
ग्राहकांना घरपोच सेवा
देण्याच्या उद्देशाने ‘लक्ष्यवेध मोहिमेचे’आयोजन गोवा क्षेत्रिय कार्यालयाने केले
होते. त्यामध्ये कोल्हापूर विभागाने पोस्टाच्या विविध उपक्रमांतर्गत उल्लेखनीय काम केल्याबद्दल पोस्टमास्तर जनरल, गोवा रिजन यांच्याकडून यशस्वितांचा
सत्कार करण्यात आला. यामध्ये उत्तर उप विभागाचे सहा. अधीक्षक संदीप कडगावकर यांनी गोवा
रिजन मध्ये तिसरा क्रमांक तर कोल्हापूर विभागामध्ये पहिला क्रमांक मिळवला.
पोस्ट ऑफिस श्रेणीमध्ये मंगळवार
पेठ पोस्ट ऑफिसच्या पोस्टमास्तर संगीता भोसले यांनी गोवा रिजन मध्ये पहिला
क्रमांक तर बांबवडा पोस्ट ऑफिसचे पोस्टमास्तर विजय चौगुले यांना तिसरा क्रमांक मिळाला.
महिला प्रधान एजंट श्रेणीमध्ये अनिता विभुते (कागल पोस्ट ऑफिस) यांनी गोवा रिजन मध्ये
२ रा क्रमांक मिळवला. तसेच इंडिया पोस्ट पेमेंट बँकेतर्फे महामिशन ७५
या स्पर्धेतंर्गत गडहिंग्लजच्या डाक निरिक्षक दीपक
देवानी यांना प्रथम क्रमांक तर गारगोटी उप विभागाचे डाक निरीक्षक निलकंठ मंडल यांना २ रा क्रमांक मिळाला. तसेच पोस्टल वौरीयर मोहिमेंतर्गत गडहिंग्लज निरिक्षक दीपक देवांनी यांना प्रथम
क्रमांक तर उत्तर उप विभागाचे सहा. अधिक्षक संदीप कडगावकर यांना २ रा क्रमांक मिळाला.
जिल्हा प्रवर अधिक्षक रुपेश
सोनावले यांच्या हस्ते सर्व यशस्वितांचा सत्कार करण्यात आला. यावेळी रुपेश सोनावले तसेच इंडिया पोस्ट पेमेंट बँक
वरिष्ठ प्रबंधक अमोल कांबळे यांचे मार्गदर्शन लाभले. सहा. अधिक्षक पश्चिम
उपविभाग वैशाली कापसे यांनी मान्यवरांचे स्वागत केले. जनसंपर्क अधिकारी संजय पताडे
यांनी प्रास्ताविक केले तर इचलकरंजी उप
विभागाचे सहा.अधिक्षक डॉ. निरंजन ग्रामोपाध्ये यांनी आभार मानले.
00000
No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.