227
गावांमधून 22 हजार 285 कुटुंबातील
1 लाख 6
हजार 946 जणांचे स्थलांतर
-जिल्हाधिकारी दौलत देसाई
कोल्हापूर
दि.7 (जिमाका) :- एकूण 227 गावांमधून 22 हजार
285 कुटुंबातील 1 लाख 6 हजार 946 व्यक्तींचे सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्यात आले आहे.
याकामी 56 बोटी आणि 425 कर्मचारी कार्यरत आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी दौलत देसाई
यांनी दिली.
तालुकानिहाय कुटुंब आणि सदस्य संख्या पुढीलप्रमाणे
- कागल - 25 गावातील 1 हजार 73 कुटुंबातील 5 हजार 542 सदस्य, राधानगरी – 12 गावातील
558 कुटुंबातील 3 हजार 40 सदस्य, गडहिंग्लज – 15 गावातील 936 कुटुंबातील 4 हजार 3 सदस्य,
आजरा– 19 गावातील 81 कुटुंबातील 313 सदस्य, भुदरगड – 14 गावातील 257 कुटुंबातील 1 हजार
31 सदस्य, शाहुवाडी – 6 गावातील 123 कुटुंबातील 489 सदस्य, पन्हाळा – 28 गावातील
405 कुटुंबातील 1 हजार 833 सदस्य, शिरोळ – 43 गावातील 7 हजार 857 कुटुंबातील 42 हजार
757 सदस्य, हातकणंगले – 21 गावातील 4 हजार 401 कुटुंबातील 20 हजार 790 सदस्य, करवीर
– 25 गावातील 3 हजार 879 कुटुंबातील 16 हजार 43 सदस्य, गगनबावडा– 2 गावातील 50 कुटुंबातील
241 सदस्य, चंदगड – 11 गावातील 96 कुटुंबातील 516 सदस्य तर महापालिकेच्या माध्यमातून
2 हजार 569 कुटुंबातील 10 हजार 348 जणांचे स्थलांतर करण्यात आले.
यासाठी
करवीर तालुक्यात 18 बोटी व 224 कर्मचारी, शिरोळ तालुक्यात 16 बोटी व 73 कर्मचारी, हातकणंगले
तालुक्यासाठी 4 बोटी व 26 कर्मचारी, महापालिका क्षेत्रात 10 बोटी व 62 कर्मचारी, गडहिंग्लजसाठी
2 बोटी व 10 कर्मचारी तसेच आजरा व चंदगड तालुका वगळता उर्वरित तालुक्यांसाठी प्रत्येकी
एक बोट व 5 कर्मचारी नेमण्यात आले आहेत यामध्ये लष्कर, नौदल, एनडीआरएफ, जिल्हा प्रशासन,
सामाजिक संस्था, महानगरपालिका, नगरपालिका यांचा समावेश आहे.
००००००
No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.