** जिल्हा माहिती कार्यालयाच्या संकेतस्थळावर आपले स्वागत ** बातम्या, लेख, पर्यटन विषयक माहिती, पत्रकारांसाठीच्या विविध योजना, लोकराज्यसह इतर **

Wednesday, August 7, 2019

पूरग्रस्तांसाठी भोजन आणि वैद्यकीय सुविधा पुरवा - पालकमंत्री चंद्रकांत पाटील


पूरग्रस्तांसाठी भोजन आणि वैद्यकीय सुविधा पुरवा
                                                                         - पालकमंत्री चंद्रकांत पाटील  
कोल्हापूर, दि. 7 (जि.मा.का.) : स्थलांतरित केलेल्या पूरग्रस्तांना महिला बचत गटाच्या माध्यमातून भोजन आणि आवश्यक वैद्यकीय सुविधा पुरवा, अशा सूचना पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिल्या.
पालकमंत्री श्री. पाटील यांनी आज शहरातील पूरपरिस्थिती पाहणी दौरा केल्यानंतर जिल्हा परिषदेमध्ये विभागप्रमुखांची आढावा बैठक घेतली. या बैठकीला खासदार संजय मंडलिक, आमदार चंद्रदीप नरके, जिल्हाधिकारी दौलत देसाई, मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल, निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी रविकांत अडसूळ, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. केम्पी पाटील आदि उपस्थित होते.
पूरपरिस्थितीबाबत सद्यस्थिती आणि संभाव्य मदत कार्य तयारी याबाबतचा सविस्तर आढावा पालकमंत्री श्री. पाटील यांनी घेतला. ते म्हणाले, प्रयाग चिखली, आंबेवाडी येथील पूरग्रस्तांसाठी प्राधान्याने बोटी पुरवाव्यात तसेच शिरोळसाठीही बोटी पाठवाव्यात. शिबीरामध्ये दाखल केलेल्या पूरग्रस्तांसाठी भोजनाची व्यवस्था आणि आरोग्य सुविधा पुरविणे हे करावे लागेल. त्यासाठी महिला बचत गटाच्या माध्यमातून भोजनाची सोय करा त्यासाठी येणारा खर्च दिला जाईल. त्याचबरोबर तात्काळ वैद्यकीय सुविधा पुरवा, औषधांचा तुटवडा होणार नाही याची दक्षता घ्या. जिल्ह्यात चांगल्या पध्दतीने मदत कार्य सुरु आहे. सर्वच यंत्रणांनी सतर्क राहून यापुढेही समन्वयाने कामकाज करावे, असेही ते म्हणाले.  
००००००


No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.