** जिल्हा माहिती कार्यालयाच्या संकेतस्थळावर आपले स्वागत ** बातम्या, लेख, पर्यटन विषयक माहिती, पत्रकारांसाठीच्या विविध योजना, लोकराज्यसह इतर **

Monday, August 5, 2019

जिल्ह्यात प्रयाग चिखली आणि शिरोळ येथे आपत्ती निवारण पथक


जिल्ह्यात प्रयाग चिखली आणि शिरोळ येथे आपत्ती निवारण पथक
          कोल्हापूर, दि. 5, (जि. मा. का.) : जिल्ह्यात सुरु असलेल्या अतिवृष्टीमुळे तसेच विविध धरणांमधून सोडलेल्या पाण्यामुळे नद्यांच्या पाणी पातळीत मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. त्यामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला आहे.  कोणताही अनुचित प्रकार होऊ नये यासाठी जिल्ह्यात राष्ट्रीय आपत्ती निवारण पथकाला (NDRF) पाचारण करण्यात आले आहे. प्रयाग चिखली येथे १० आणि शिरोळ येथे १० जणांचे  हे पथक रात्री तैनात करण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिली. 
          जिल्ह्यात होत असलेल्या अतिवृष्टीमुळे नद्यांच्या पाणीपातळीत झालेली वाढ, ओढे नाले यांना मोठ्या प्रमाणावर आलेले पाणी या पार्श्वभूमीवर नागरिकांनी अनावश्यक बाहेर जाणे टाळावे. नदीकाठची गावे, वाड्या, वस्त्यांमध्ये राहणाऱ्या नागरिकांनी सुरक्षेच्या कारणास्तव नदीपात्रात प्रवेश करून नये. पशुधन यांच्या सुरक्षेची काळजी घेवून सतर्क रहावे, असे आवाहनही जिल्हाधिकारी श्री देसाई यांनी केले आहे. 
          सांगली जिल्हा स्तरावर नियंत्रण कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. सध्या हा कक्ष २४ तास सुरू आहे. त्याचा संपर्क क्रमांक ०२३१२६५५३/५४, 2659232 किंवा टोल फ्री क्रमांक १०७७ वर संपर्क साधता येईल.
0000

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.