** जिल्हा माहिती कार्यालयाच्या संकेतस्थळावर आपले स्वागत ** बातम्या, लेख, पर्यटन विषयक माहिती, पत्रकारांसाठीच्या विविध योजना, लोकराज्यसह इतर **

Monday, August 5, 2019

कृषी राज्य मंत्री सदाभाऊ खोत यांनी केली पुरग्रस्त भागाची पाहणी/पुरग्रस्तांच्या सोयीसाठी तहसिलदारांची जयसिंगपूर पालिकेत बैठक/पंचनामा करून शासना /मंगळवार आणि बुधवारी जिल्ह्यातील शाळा-महाविद्यालयांना सुट्टी -जिल्हाधिकारी दौलत देसाईकडून मदत दिली जाईल दानोळीमधील शेतकऱ्यांला तहसिलदारांचा दिलासा


कृषी राज्य मंत्री सदाभाऊ खोत यांनी केली पुरग्रस्त भागाची पाहणी
कोल्हापूर, दि. 5 (जि.मा.का) :कृषी राज्य मंत्री सदाभाऊ खोत यांनी आज शिरोळ तालुक्यातील नृसिंहवाडी आणि कुरूंदवाड येथे भेट देवून पुरग्रस्त भागाची पाहणी केली. येणार्या आपत्तीला तोंड देण्यासाठी शासन सज्ज आहे. नागरिकांनी सहकार्य करावे. त्यांना आवश्यक ती मदत केली जाईल, असे श्वासन त्यांनी यावेळी दिले.
नृसिंहवाडी येथील पाहणीनंतर कोयना धरणामधून होणारा विसर्ग, त्या परिसरात सध्या पडणारा पाऊस याविषयी  सातारा जिल्हाधिकारी श्रीमती श्वेता सिंघल यांच्याशी त्यांनी दूरध्वनीवर संपर्क साधून माहिती घेतली. यानंतर स्वत: ट्रॅक्टर चालवत ते कुरूंदवाडकडे गेले. या ठिकाणी त्यांनी पुर परिस्थितीची पाहणी केली. तहसिलदार गजानन गुरव यांच्याकडून  सद्यस्थितीबाबत त्यांनी सविस्तर माहिती घेतली. येणार्या आपत्तीला तोंड देण्यासाठी आवश्यक ती उपाययोजना शासनाने केली आहे. पुरग्रस्तांना योग्य ती मदत केली जाईल, नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले.
यावेळी आम. उल्हास पाटील, जयसिंगपूरच्या नगराध्यक्ष डॉ. निता माने, तहसिलदार गजानन गुरव, गटविकास अधिकारी विजयसिंह जाधव आदी उपस्थित होते.
000

पुरग्रस्तांच्या सोयीसाठी तहसिलदारांची जयसिंगपूर पालिकेत बैठक
        कोल्हापूर, दि. 5 (जि.मा.का) : सध्या तालुक्यात उद्भवलेल्या पुर परिस्थितीच्या अनुषंगाने तहसिलदार गजानन गुरव यांनी जयसिंगपूर नगरपालिकेत व्यापारी विविध सामाजिक संस्था यांची बैठक घेवून पूर्व तयारीबाबत चर्चा केली.
या बैठकीला नगराध्यक्ष डॉ. निता माने, गटविकास अधिकारी विजयसिंह जाधव, मुख्याधिकारी दिपक झिंजाड, नगरसेवक बजरंग खामकर,  अर्जुन देशमुख, राजेंद्र नांद्रेकर, राजेंद्र झेले, डॉ. अतिक पटेल, मेघराज उर्फ नंदू बलदवा, सागर आडगाने, दादा पाटील-चिंचवाडकर, दशरथ शेटे  आदी उपस्थित होते.
तहसिलदार गुरव यावेळी म्हणाले, चिंचवाड, अर्जुनवाड, कोथळी, उमळवाड आदी  पुरग्रस्त गावातील कुटूंबांना सध्या स्थलांतरीत करण्यात येत आहे. सध्याच्या पाणी पातळीत जर आणखी वाढ झाली तर आणखी काही कुटूंबांना स्थलांतरीत करण्यात येईल. अशा नागरिकांची निवासाची तसेच भोजन आणि वैद्यकीय सुविधेची सोय आपल्या सर्वांना मिळून करावी लागेल. त्यासाठी आपण पूर्व तयारी ठेवू. शक्य झाल्यास जनावरांच्या चाऱ्याची सोय देखील करण्यासाठी प्रयत्न करू.
वैद्यकीय सुविधा देणार्या पथक निर्मितीबाबत आमची चर्चा झाली असून त्यासाठी तयारी झाली आहे. असे सांगून नगराध्यक्ष डॉ. माने म्हणाल्या, 2005 च्या अनुभवाने आम्हा सर्वांची तयारी आहे. जयसिंगपूरवासियांकडून सर्व सहकार्य केले जाईल, असे श्वासन त्यांनी यावेळी दिले.
000







पंचनामा करून शासनाकडून मदत दिली जाईल
दानोळीमधील शेतकऱ्यांला तहसिलदारांचा दिलासा
कोल्हापूर, दि. 5 (जि.मा.का) : दानोळी येथील जनगोंड पाराज (पाटील) यांची आरसीसी बांधिव विहीर अचानकपणे ढासळली. घटनेची माहिती मिळताच तहसिलदार गजानन गुरव यांनी आज घटनास्थळी भेट देवून शेतकऱ्याला मदतीचा दिलासा दिला.
कोथळी आणि दानोळी गावातील पूरग्रस्त भागाची त्यांनी आज पाहणी केली. यावेळी गटविकास अधिकारी विजयसिंह जाधव, माजी खासदार निवेदीता माने, सरपंच सुजाता शिंदे, सतीश मलमे, सर्जेराव शिंदे, वृषभ पाटील आदी उपस्थित होते.
स्थलांतरीत करण्यात आलेले कुटूंबे, बाधित झालेला भाग यांची माहिती घेवून नागरिकांनी प्रशासनाला मदत करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.
000














मंगळवार आणि बुधवारी जिल्ह्यातील शाळा-महाविद्यालयांना सुट्टी
                                     -जिल्हाधिकारी दौलत देसाई
        कोल्हापूर, दि. 5 (जि.मा.का.)- हवामान विभागाने दिलेला अतिवृष्टीचा इशारा आणि जिल्ह्यातील सद्यस्थिती पहाता आपत्ती कालीन परिस्थीती निर्माण झालेली आहे. याचा परिणाम शालेय विद्यार्थीना होऊ नये म्हणून उद्या मंगळवार दि 6 आणि बुधवार दि 7 ऑगस्ट रोजी जिल्ह्यातील प्राथमिक, माध्यमिक तसेच महाविद्यालय यांना सुट्टी जाहीर करण्याचे आदेश, जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी आज दिले.
        जिल्ह्यात 5 हजारपेक्षा अधिकजणांचे स्थलांतर करण्यात आले आहे. विविध राज्य, जिल्हा आणि ग्रामीण मार्ग बंद असल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण झाला आहे. पंचगंगा नदीची पातळी 48.5 फूट झाली आहे. जिल्ह्यात पूर परिस्थिती गंभीर असल्याने उद्या मंगळवार आणि परवा बुधवारी जिल्ह्यातील प्राथमिक, माध्यमिक आणि महाविद्यालये यांना सुट्टी जाहीर करीत आहे.
0000

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.