कोल्हापूर,
दि. 7 (जि.मा.का.) : माजी सैनिक, विधवांच्या पाल्यांनी शिष्यवृत्तीसाठी 15 ऑक्टोबर
पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी सुभाष सासने यांनी केले
आहे.
सन 2018-19 या वर्षामध्ये इयत्ता
10 वी, 12 वी, डिप्लोमा अथवा पदवी परिक्षेत कमीत कमी 60 टक्के गुण मिळवणारे पाल्य या
शैक्षणिक शिष्यवृत्तीसाठी पात्र आहेत. एखाद्या अभ्यासक्रमासाठी प्रवेश उशीरा
मिळाल्यास प्रवेश मिळाल्यापासून एक महिन्याच्या आत अर्ज सादर करणे आवश्यक आहे.
ज्या पाल्यांनी सीईटी अथवा जेईई किंवा इतर कारणांसाठी गॅप घेऊन शैक्षणिक वर्ष
2019-20 मध्ये प्रथम वर्षासाठी प्रवेश घेतला आहे त्यांनी अर्जासोबत गॅप सर्टिफिकेट जोडणे आवश्यक आहे.
आवश्यक कागदपत्रे व अधिक माहीतीसाठी
जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, दूरध्वनी क्रमांक 0231- 2665812 येथे कार्यालयीन
वेळेत संपर्क साधावा.
000000
No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.