** जिल्हा माहिती कार्यालयाच्या संकेतस्थळावर आपले स्वागत ** बातम्या, लेख, पर्यटन विषयक माहिती, पत्रकारांसाठीच्या विविध योजना, लोकराज्यसह इतर **

Wednesday, August 7, 2019

गुरुवार आणि शुक्रवारी जिल्ह्यातील शाळा-महाविद्यालयांना सुट्टी -जिल्हाधिकारी दौलत देसाई


गुरुवार आणि शुक्रवारी जिल्ह्यातील शाळा-महाविद्यालयांना सुट्टी
                                     -जिल्हाधिकारी दौलत देसाई
        कोल्हापूर, दि. 7 (जि.मा.का.)- हवामान विभागाने दिलेला अतिवृष्टीचा इशारा आणि जिल्ह्यातील सद्यस्थिती पहाता आपत्कालीन परिस्थिती निर्माण झालेली आहे. याचा परिणाम शालेय विद्यार्थ्यांवर होऊ नये म्हणून उद्या गुरुवार दि 8 आणि शुक्रवार दि 9 ऑगस्ट रोजी जिल्ह्यातील प्राथमिक, माध्यमिक तसेच महाविद्यालय यांना सुट्टी जाहीर करण्याचे आदेश, जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी आज दिले.
        विविध राज्य, जिल्हा आणि ग्रामीण मार्ग बंद असल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण झाला आहे. पंचगंगा नदीची पातळी 55.6 फूट झाली आहे. जिल्ह्यात पूर परिस्थिती गंभीर असल्याने उद्या गुरुवार आणि परवा शुक्रवारी जिल्ह्यातील प्राथमिक, माध्यमिक आणि महाविद्यालये यांना सुट्टी जाहीर करीत आहे.
0000


No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.