इंडिया ई च्या Dictionary मध्ये जिमाका चा ब्लॉग

गुरुवार, ६ ऑगस्ट, २०२०

जिल्ह्यातील 23 गावांमधील 1750 कुटुंबातील 4413 व्यक्तींचे स्थलांतर -जिल्हाधिकारी दौलत देसाई


 

     कोल्हापूर, दि. 6 (जि.मा.का.) : जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे 23 गावांमधील 1750 कुटुंबातील 4413 व्यक्तींचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिली. 

       स्थलांतरीत कुटुंबांची तालुकानिहाय माहिती पुढीलप्रमाणे गडहिंग्लज बाधित गावांची संख्या 2, 5 कुटुंबातील 21 व्यक्ती, 14 जनावरे. पन्हाळा- बाधित 2 गावातील 3 कुटुंबातील 14 व्यक्ती एका जनावरासह स्थलांतर झाले आहे. करवीर- 3 बाधित गावांमध्ये 1603 कुटुंबातील 3850 व्यक्ती आणि 1038 जनावरे स्थलांतरीत करण्यात आले आहेत.  गगनबावडा -बाधित 8 गावांमधील 21 कुटुंबातील 68 व्यक्तींचे स्थलांतर झाले आहे.          आजरा तालुक्यातील सुळेरानमधील 1 कुटुंबातील 9 व्यक्तींचे स्थलांतर झाले आहे. चंदगड-  बाधित 6 गावातील 97 कुटुंबातील 377 व्यक्ती 47 जनावरांचे स्थलांतर करण्यात आले आहे. कोल्हापूर महानगरपालिका क्षेत्रातील 20 कुटूंबातील 74 नागरिकांना दसरा चौकातील चित्रदुर्ग मठ येथे स्थलांतरीत करण्यात आले आहे.

            अशा जिल्ह्यातील एकूण 23 गावांमधील 1750 कुटुंबातील 4413 व्यक्तींना आणि 1100 जनावरांना  सुरक्षित ठिकाणी स्थलांतरीत करण्यात आले आहे.

0 0 0 0 0 0

 

 


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.