** जिल्हा माहिती कार्यालयाच्या संकेतस्थळावर आपले स्वागत ** बातम्या, लेख, पर्यटन विषयक माहिती, पत्रकारांसाठीच्या विविध योजना, लोकराज्यसह इतर **

Wednesday, September 30, 2020

कोरोना हॉटस्पॉट क्षेत्रात मोबाईल व्हॅनद्वारे जनजागृती कार्यक्रम जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्या हस्ते कार्यक्रमाचा शुभारंभ

 




कोल्हापूर, दि. 30 (जिल्हा माहिती कार्यालय): केंद्र शासनाच्या माहिती व प्रसारण विभागाच्या क्षेत्रीय लोक संपर्क ब्युरो कोल्हापूर विभागाच्यावतीने तयार करण्यात आलेल्या मोबाईल व्हॅनद्वारे जिल्ह्यात कोरोना हॉटस्पॉट क्षेत्रात जनजागृती करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाचा शुभारंभ जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्या हस्ते करण्यात आला.

            जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमाप्रसंगी निवासी उपजिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे, डॉ. उषादेवी कुंभार, जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत सातपुते व क्षेत्रीय प्रचार कार्यालयाचे प्रमोद खंडागळे उपस्थित होते.        

            कोरोना साखळी तोडण्यासाठी कोरोना हॉटस्पॉट क्षेत्रातील लोकांचे प्रबोधन व्हावे, मास्क वापरणे, वारंवार हात धुणे आणि सामाजिक अंतर राखणे आणि आरोग्य विषयक काळजी घेण्यासाठी या मोबाईल व्हॅनवरुन शाहिरी कलापथकाच्या माध्यमातून जनजागृती केली जाणार आहे. या बरोबरच  मोबाईल व्हॅनवरुन ऑडिओ क्लिपद्वारेही जनजागृती केली जाणार आहे.

000000

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.