कोल्हापूर, दि. 22 (जिल्हा माहिती कार्यालय) :
सर्व नगरपालिक क्षेत्रात ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ या मोहिमेची नगरपालिका
क्षेत्रात नगरसेवक, सामाजिक संस्था, तरुण मंडळे यांच्या सहकार्याने मोठ्या
प्रमाणात जनजागृती करा. चौका चौकात होर्डिंग्ज लावावीत. प्रभागातील घराघरांवर
स्टिकर्स लावावेत, अशी सूचना जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी आज दिली.
जिल्ह्यातील सर्व नगरपालिका, नगरपंचायती,
नगरपरिषद मुख्याधिकारी यांच्याशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे जिल्हाधिकारी श्री.
देसाई यांनी संवाद साधला. जिल्हा प्रशासन अधिकारी दीपक पाटील, जिल्हा आपत्ती
व्यवस्थापन प्राधिकरणाचे समन्वयक संजय शिंदे उपस्थित होते.
जिल्हाधिकारी
श्री. देसाई यांनी नगरपालिका, नगरपंचायती निहाय आढावा घेतला. ते म्हणाले, ‘माझे
कुटुंब माझी जबाबदारी’ या मोहिमेची मोठ्या
प्रमाणात जनजागृती करुन प्रभावीपणे सर्व्हेक्षणाचे काम करावे. त्यासाठी नेमलेल्या पथकात मुख्याधिकाऱ्यांनी
स्वत: किमान अर्धा तास सहभागी व्हावे. इली आणि सारीचे रुग्ण मोठ्या प्रमाणात शोधून
त्यांची स्वॅब तपासणी करावी. हॉटस्पॉटचे
सर्व्हेक्षण सुरु ठेवावे. पुन्हा पुन्हा सर्व्हेक्षण करा. एचआरसीटी तपासणी करणाऱ्या
लॅबचा ग्रुप करावा. त्यामध्ये तपासणी झालेल्यांचा अहवाल मागवून घ्यावा आणि अशा
संशयितांचा पाठपुरावा करुन त्यांची स्वॅब तपासणी करायला लावा.
नगरसेवक, सर्वपक्षीय कार्यकर्ते
यांच्या सहकार्याने होर्डिंग उभे करावेत. घराघरांवर स्टिकर लावावेत. विना मास्क
फिरणार नाही, सुरक्षित अंतर राखणे, वारंवार हात धुणे, सॅनिटायझरचा वापर करणे यावर
अधिक भर द्यावा. कारखान्याच्या ठिकाणी नो मास्क नो वर्क असे फलक लावण्यात यावेत,
असेही ते म्हणाले.
0000000

No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.