** जिल्हा माहिती कार्यालयाच्या संकेतस्थळावर आपले स्वागत ** बातम्या, लेख, पर्यटन विषयक माहिती, पत्रकारांसाठीच्या विविध योजना, लोकराज्यसह इतर **

Tuesday, September 15, 2020

आजअखेर 24 हजार 282 जणांना डिस्चार्ज -डॉ. बी. सी. केम्पी पाटील

 


   कोल्हापूर, दि. 15 (जिल्हा माहिती कार्यालय) : आज संध्याकाळी 5 वाजेपर्यंत आरटीपीसीआर आणि सीबीएनएएटी चाचणीचे 1 हजार 598 प्राप्त अहवालापैकी 1 हजार 140 निगेटिव्ह तर 432 अहवाल पॉझीटिव्ह आहेत. (1 अहवाल दुसऱ्यांदा पॉझिटिव्ह व 25 अहवाल नाकारण्यात आले), अॅन्टीजेन टेस्टिंग चाचणीचे 459 प्राप्त अहवालापैकी निगेटिव्ह 374 तर 85 पॉझीटिव्ह (108 निगेटिव्ह अहवाल आरटीपीसीआरसाठी तपासणीसाठी पाठविले), खासगी रुग्णालये/लॅब मधील 2 पॉझीटिव्ह आले असे एकूण 519 अहवाल पॉझीटिव्ह आहेत.

जिल्ह्यात आजअखेर एकूण 36 हजार 71 पॉझीटिव्हपैकी 24 हजार 282 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आजअखेर जिल्ह्यात एकूण 10 हजार 666 पॉझीटिव्ह रुग्ण आहेत, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बी. सी. केम्पी-पाटील यांनी आज दिली.

आज संध्याकाळी 5 वाजेपर्यंत प्राप्त 519 पॉझीटिव्ह अहवालापैकी आजरा-25, भुदरगड- 23, चंदगड-16, गडहिंग्लज-34, गगनबावडा- 1, हातकणंगले- 39, कागल-17, करवीर-73, पन्हाळा- 22, राधानगरी- 37, शाहूवाडी-23, शिरोळ- 47, नगरपरिषद क्षेत्र- 60, कोल्हापूर महापालिका क्षेत्र- 94 व इतर शहरे व राज्य 8 असा समावेश आहे.

आजअखेर तालुका, नपा आणि मनपा क्षेत्रनिहाय रुग्णांची संख्या पुढीलप्रमाणे - आजरा-638, भुदरगड- 836, चंदगड- 769, गडहिंग्लज- 858, गगनबावडा- 99, हातकणंगले-4109, कागल-1232, करवीर-4029, पन्हाळा- 1347, राधानगरी-982, शाहूवाडी- 861, शिरोळ- 1965, नगरपरिषद क्षेत्र-5760, कोल्हापूर महापालिका क्षेत्र- 11 हजार 376 असे एकूण  34 हजार 861 आणि इतर जिल्हा व राज्यातील – 1 हजार 210 असे मिळून एकूण 36  हजार 71 रुग्णांची आजअखेर जिल्ह्यात संख्या आहे.

            जिल्ह्यातील एकूण 36 हजार 71 पॉझीटिव्ह रूग्णांपैकी 24 हजार 282 रूग्णांना डिस्चार्ज मिळाला आहे. तर एकूण 1 हजार 123 जणांचा मृत्यू झाला असल्यामुळे आजअखेर उपचारार्थ दाखल झालेल्या जिल्ह्यातील रूग्णांची संख्या 10 हजार 666 इतकी आहे.

0000000

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.