** जिल्हा माहिती कार्यालयाच्या संकेतस्थळावर आपले स्वागत ** बातम्या, लेख, पर्यटन विषयक माहिती, पत्रकारांसाठीच्या विविध योजना, लोकराज्यसह इतर **

Wednesday, September 16, 2020

‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ मोहिमेचा तुर्केवाडी येथे आमदार राजेश पाटील यांच्या हस्ते शुभारंभ





कोल्हापूर, दि. 16 (जिल्हा माहिती कार्यालय) : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात 15 सप्टेंबर पासून ‘माझे कुटंब माझी जबाबदारी’ मोहीम राबविण्यात येत असून जिल्ह्यातही ही मोहीम व्यापक प्रमाणात राबवून नागरिकांच्या आरोग्याची तपासणी केली जात आहे. ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ या मोहिमेचा चंदगड तालुक्यातील मौजे तुर्केवाडी येथे आमदार राजेश पाटील यांच्या हस्ते आज शुभारंभ करण्यात आला.

यावेळी पंचायत समिती सदस्या श्रीमती विठाताई मुरकुटे, तहसिलदार श्री. विनोद रणवरे, गटविकास अधिकारी श्री. बोडरे, सरपंच रुद्राप्पा  श्री. तेली, उपसरपंच अरुण पवार, ग्रामविकास अधिकारी अशोक पाटील, तलाठी श्रीमती पवार, तुर्केवाडी आरोग्य उपकेंद्र कर्मचारी, आशा सेविका, अंगणवाडी  सेविका व ग्रामस्थ उपस्थित होते.

000000

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.