** जिल्हा माहिती कार्यालयाच्या संकेतस्थळावर आपले स्वागत ** बातम्या, लेख, पर्यटन विषयक माहिती, पत्रकारांसाठीच्या विविध योजना, लोकराज्यसह इतर **

Friday, September 18, 2020

ऑनलाईन जॉब फेअरचे गुरुवारी व शुक्रवारी आयोजन इच्छुक उमेदवारांनी लाभ घ्यावा - सहायक आयुक्त सं.कृ. माळी

 


       कोल्हापूर, दि. 18 (जिल्हा माहिती कार्यालय):  जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र व शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने  ऑनलाईन जॉब फेअरचे  दि 24 व 25 सप्टेंबर रोजी आयोजन केले असल्याचे कौशल्य विकास,रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र सहायक आयुक्त सं.कृ. माळी यांनी कळविले आहे. 

            या मेळाव्यामध्ये विविध शैक्षणिक पात्रतेची जिल्हयातील नामांकित आस्थापनांची विविध रिक्तपदांद्वारे मोठी सुवर्णसंधी मिळणार आहे. हा मेळावा केवळ ऑनलाईन पसंतीक्रम नोदविणा-या उमेदवारांसाठीच आहे. जिल्हयातील इच्छुक उमेदवारांनी संधीचा लाभ घ्यावा. युझर आयडी व पासवर्डच्या आधारे www.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर शैक्षणिक पात्रतेनुसार उचित असलेल्या रिक्तपदासाठी पसंतीक्रम व उत्सुकता ऑनलाईन पध्दतीने नोंदवावी.

            आवश्यक पात्रता धारण करीत असल्याची खात्री करुन पदाची निवड करण्याची दक्षता घ्यावी. जेणेकरुन कोरोनाच्या प्रादूभार्वामुळे शासनाने विहित केलेल्या अटी व शर्तीचे पालन करणे व संधीचा लाभ घेणे उद्योजक व उमेदवार यांना सहज शक्य होईल.

            इच्छुक व ऑनलाईन पसंतीक्रम नोंदविणा-या उमेदवारांना त्यांच्या पसंतीक्रमानुसार व उद्योजकांच्या सोईनुसार मुलाखतीचे ठिकाण, दिनांक व वेळ एसएमएस अलर्टं द्वारे कळविण्यात येईल व शक्य असेल तिथे ऑनलाईन किंवा ऑफलाईन मुलाखतींचे आयोजन करण्यात येईल.

            इच्छुक युवक युवतींनी दि.24 व 25 सप्टेंबर पर्यंत पसंतीक्रम नोंदवून या संधीचा न चुकता लाभ घ्यावा. असे आवाहन सहाय्यक आयुक्त श्री माळी यांनी केले आहे.  अधिक माहितीसाठी दूरध्वनी क्र 0231-2545677 वर संपर्क साधावा. 

0 0 0 0  00

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.