** जिल्हा माहिती कार्यालयाच्या संकेतस्थळावर आपले स्वागत ** बातम्या, लेख, पर्यटन विषयक माहिती, पत्रकारांसाठीच्या विविध योजना, लोकराज्यसह इतर **

Monday, September 14, 2020

आजअखेर 23 हजार 206 जणांना डिस्चार्ज -डॉ. बी. सी. केम्पी पाटील

 


   कोल्हापूर, दि. 14 (जिल्हा माहिती कार्यालय) : आज संध्याकाळी 5 वाजेपर्यंत आरटीपीसीआर आणि सीबीएनएएटी चाचणीचे 2 हजार 497 प्राप्त अहवालापैकी 1 हजार 928 निगेटिव्ह तर 562 अहवाल पॉझीटिव्ह आहेत. (1 अहवाल दुसऱ्यांदा पॉझिटिव्ह व 6 अहवाल नाकारण्यात आले), अॅन्टीजेन टेस्टिंग चाचणीचे 389 प्राप्त अहवालापैकी निगेटिव्ह 314 तर 75 पॉझीटिव्ह (85 निगेटिव्ह अहवाल आरटीपीसीआरसाठी तपासणीसाठी पाठविले), खासगी रुग्णालये/लॅब मधील 285 पॉझीटिव्ह आले असे एकूण 922 अहवाल पॉझीटिव्ह आहेत.

जिल्ह्यात आजअखेर एकूण 35 हजार 552 पॉझीटिव्हपैकी 23 हजार 206 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आजअखेर जिल्ह्यात एकूण 11 हजार 257 पॉझीटिव्ह रुग्ण आहेत, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बी. सी. केम्पी-पाटील यांनी आज दिली.

आज संध्याकाळी 5 वाजेपर्यंत प्राप्त 922 पॉझीटिव्ह अहवालापैकी आजरा-24, भुदरगड- 55, चंदगड-25, गडहिंग्लज-20, गगनबावडा- 2, हातकणंगले- 76, कागल-45, करवीर-125, पन्हाळा- 57, राधानगरी- 29, शाहूवाडी-48, शिरोळ- 30, नगरपरिषद क्षेत्र- 81, कोल्हापूर महापालिका क्षेत्र- 267 व इतर शहरे व राज्य 38 असा समावेश आहे.

आजअखेर तालुका, नपा आणि मनपा क्षेत्रनिहाय रुग्णांची संख्या पुढीलप्रमाणे - आजरा-613, भुदरगड- 813, चंदगड- 753, गडहिंग्लज- 824, गगनबावडा- 98, हातकणंगले-4070, कागल-1215, करवीर-3956, पन्हाळा- 1325, राधानगरी- 945, शाहूवाडी- 838, शिरोळ- 1918, नगरपरिषद क्षेत्र-5700, कोल्हापूर महापालिका क्षेत्र- 11 हजार 282 असे एकूण  34 हजार 350 आणि इतर जिल्हा व राज्यातील – 1 हजार 202 असे मिळून एकूण 35  हजार 552 रुग्णांची आजअखेर जिल्ह्यात संख्या आहे.

            जिल्ह्यातील एकूण 35 हजार 552 पॉझीटिव्ह रूग्णांपैकी 23 हजार 206 रूग्णांना डिस्चार्ज मिळाला आहे. तर एकूण 1 हजार 89 जणांचा मृत्यू झाला असल्यामुळे आजअखेर उपचारार्थ दाखल झालेल्या जिल्ह्यातील रूग्णांची संख्या 11 हजार 257 इतकी आहे.

0000000

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.