** जिल्हा माहिती कार्यालयाच्या संकेतस्थळावर आपले स्वागत ** बातम्या, लेख, पर्यटन विषयक माहिती, पत्रकारांसाठीच्या विविध योजना, लोकराज्यसह इतर **

Tuesday, September 15, 2020

लाळ खुरकत रोग प्रतिबंधक लसीकरण मोहीम मोहीमेची प्रभावी व यशस्वी अंमलबजावणी करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

 


 

कोल्हापूर, दि. 15 (जिल्हा माहिती कार्यालय) : राष्ट्रीय पशुरोग नियंत्रण कार्यक्रमातंर्गत लाळ खुरकत रोग प्रतिबंधक लसीकरणाची पहिली फेरी दिनांक 1  ते 30 सप्टेंबर वाढीव स्वरुपात 15 दिवस वाढवून या कालावधीत मोहीम स्वरुपात राबविण्यात येत आहे. या महत्वाकांक्षी कार्यक्रमाच्या प्रभावी सनियंत्रणासाठी दि. 2 जून रोजीच्या शासन निर्णयानुसार विविध समित्या गठित केल्या आहेत. जिल्ह्यामध्ये लाळ खुरकत रोग (FMD) प्रतिबंधक लसीकरण कार्यक्रमाची प्रभावी व यशस्वी अंमलबजावणी करण्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा राष्ट्रीय पशुरोग नियंत्रण कार्यक्रमाच्या जिल्हास्तरीय संनियंत्रण समितीचे अध्यक्ष दौलत देसाई यांनी दिले आहेत.  

            राष्ट्रीय पशुरोग नियंत्रण कार्यक्रम (NADCP) अंतर्गत जिल्ह्यामधील पशुधनास लाळ खुरकत रोग (FMD) प्रतिबंधक लसीकरण टॅगींगसह बंधनकारक आहे. केंद्र पुरस्कृत कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करण्याकरिता जिल्ह्यातील अधिकारी व कर्मचारी तसेच दूध संघाचे पशुवैद्यक व खाजगी नोंदणीकृत व अनोंदणीकृत पशुवैद्यक यांची सेवा पुढील आदेश किंवा लसीकरण पूर्ण होईपर्यंत अधिग्रहीत करण्यात येत आहे.

            पशुसंवर्धन विभागाअंतर्गत कार्यरत सर्व क्षेत्रिय अधिकारी/कर्मचारी यांनी जिल्हयामधील सर्व पशुधनास (गोवर्ग व म्हैसवर्ग) केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सुचनेप्रमाणे प्रत्यक्ष लसीकरणापूर्वी टॅगीग करुन (कानात टॅग लावणे) टंग या विशिष्ठ ओळख क्रमांकासह लसीकरण केल्याची सविस्तर नोंद इनाफ (INAPH-Information Network For Animal Productivity And Health) या संगणक प्रणालीवर घ्यावी. पशुधनास टॅगीग केल्याशिवाय लसीकरणा करता येणार नाही याची गांभिर्याने नोंद घ्यावी. (No Tag – No Vaccination)         लसीकरण मोहीमेअंतर्गत लहान वासरे (4-5 महिने वयोगटातील) यांना प्रथम लसीकरण केल्यानंतर 28 दिवसांनी बुस्टर लसीकरण करण्याची योग्य ती खबरदारी घेण्यात यावी.

            लसीकरण कार्यक्रमाचे प्रसिध्दीसाठी तयार करण्यात येणारे सर्व प्रसिध्दी साहित्यांमध्ये (बॅनर्स, फलक, पोस्टर्स, लिफलेट व पॅम्पलेटस इ.) स्वस्थ पशु खुशहाल किसान, उत्पादक पशु संपन्न किसान" या बोधवाक्याचा वापर करणे अनिवार्य राहील.

            केंद्र शासनाचे राजपत्रातील अधिसूचना, प्राण्यामधील संक्रामक व सांसर्गिक रोगास प्रतिबंध व नियंत्रण अधिनियम, 2009- दिनांक 20 मार्च 2020

            अधिनियमामधील सेक्शन 2(d) नुसार अनुसूचित यादीतील संक्रामक व सांसर्गजन्य रोगांचे (लाळ-खुरकत रोग  FMD) रोगप्रतिबंधक लसीकरण करणे बंधनकारक असुन सेक्शन 6(4) नुसार सर्व पशुपालकांनी त्यांच्याकडील पशुधनास लसीकरण करुन घेणे सक्तीचे व बंधनकारक राहील. सेक्शन 8 (i) (ii) नुसार लसीकरण करणा-या सक्षम व्यक्तीने लसीकरणापूर्वा जनावरांना चिन्हांकन,गोंदण किया कानात टॅग लावणे (संबंधित विभागाचे निर्देशानुसार) बंधनकारक आहे.  सेक्शन 32 नुसार लसीकरण कामकाजासाठी सक्षम प्राधिकृत अधिकारी / कर्मचारी यांना त्यांचे प्रत्यक्ष कर्तव्य बजावत असतांना अडथळा आणणे अथवा अधिनियमातील बाबींचे उल्लंघन करणाऱ्या दोषी व्यक्तीस रुपये 1 हजार पर्यंतची दंडात्मक कारवाई किंवा दंड न भरल्यास 1 महिन्यापर्यंत कारावास शिक्षेची तरतुद केली आहे. अधिनियमातील तरतुदी विचारात घेता जिल्हयातील सर्व पशुपालकांनी राष्ट्रीय महत्वाकांक्षी लाळ-खुरकत रोग प्रतिबंधक मोहीमेअंतर्गत आपल्या  पशुधनास टॅगीगसह लसीकरण करुन घ्यावे.

        लाळ खुरकत रोग प्रतिबंधक लसीकरण कार्यक्रमाचे निर्धारित लक्ष्य वेळेत पूर्ण होण्यासाठी शहरी भागातील पशुपालकांचे पशुधनासाठी नगरपालिका / नगरपंचायत तसेच गाव पातळीवर (ग्राम विकास विभाग, ग्रामपंचायत, कृषी विभागाचे स्थानिक व राज्यस्तर, महसूल विभाग इ.) शासकीय / निमशासकीय कार्यरत सर्व कर्मचाऱ्यांनी पशुसंवर्धन विभागास आवश्यक ते सहकार्य करावे.

            प्रत्येक गावात लसीकरण कार्यक्रमाचे आयोजन व प्रसिध्दी देणे, लसीकरण कार्यक्रमासाठी स्थानिक लोक प्रतिनिधी, पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते यांचा सहभाग नोंदवणे, शेतकरी बचत गट, महिला बचत गट, इतर कार्यरत क्रियाशील सामाजिक गट यांच्या सहकार्याने लसीकरण मोहीमेची प्रसिध्दी व शेतकरी, पशुपालकांचा उत्स्फूर्त सहभाग व प्रतिसाद मिळवा गावांमध्ये एकाच सोयीच्या ठिकाणी सर्व जनावरांचे लसीकरण करावे. शेतकऱ्यांना योग्य त्या सूचना, दवंडी द्यावी. पशुसंवर्धन विभागामार्फत तयार करण्यात आलेल्या चित्रफितींना विविध शेतकऱ्यांचे किंवा इतर स्थानिकरित्या कार्यरत व्हाटसअप किंवा इतर सोशल मिडिया ग्रुपमध्ये मोटया प्रमाणात प्रसिध्दी दयावी.

            जिल्हयातील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आठवडी बाजारात खरेदो विक्रीसाठी येणा-या पशुपालकांच्या जनावरांना टंगींग व लाळ-खुरकत रोगाचे लसीकरण बंधनकारक असून त्याशिवाय कोणतीही खरेदी विक्री करता येणार नसल्याचे सहकार विभागाने बाजार समित्यांना 15 ऑक्टोबरपर्यंत कळावे. खागी / सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगामात मोठया संख्येने पशुधन परजिल्हयातुन दाखल होत असतात. या सर्व पशुधनास टॅगींगसह लसीकरण करणे बंधनकारक असून सहकार विभागाने सूचना द्याव्या

        तालुकास्तराव तहसीलदार हे तालुका सनियंत्रण समितीचे अध्यक्ष असल्याने त्यांनी वेळेावेळी लसीकरण मोहीम अंमलबजावणीबाबत आढावा घेवून येणा-या सर्व अडचणींबाबत योग्य ते मार्गदर्शन करुन प्रसंगी आवश्यक ते आदेश संबंधित यंत्रणांना निर्गमित करावेत. राष्ट्रीय कार्यक्रमांमध्ये आडकाठी आणणारे पशुवैद्यक, त्यांच्या जिल्हा  व राज्यस्तरीय संघटना व त्यांचे सदस्य यांनी पशुपालकांमध्ये नैराश्य पसरविल्यास किंवा कामकाजामध्ये खोडा घातल्यास संबंधीत पशुवैद्यक किंवा जिल्हा / राज्यस्तरीय कार्यकारिणीवर कठोर कारवाई करण्यात येईल.  

            केंद्र शासनाच्या राष्ट्रीय पशुरोग नियंत्रण कार्यक्रम (NADCP) हा शेतक-यांच्या पशुधनाचे आरोग्य हित ग्रामीण अर्थव्यवस्थेस चालना देवून शेतक-यांचे आर्थिक उत्पन्न् वाढीसाठी अत्यंत महत्वाकांक्षी असा कार्यक्रम असल्याने याबाबत सर्व संबंधित विभागांनी आपले अधिनस्थांना योग्य त्या सुचना पारित कराव्यात.  देश पातळीवर एकाच वेळी लाळ-खुरकत रोगप्रतिबंधक लसीकरणाच्या नियमित फेरींचे आयोजन करुन सन 2025 पर्यंत या रोगावर नियंत्रण मिळवणे सन 2030 अखेर रोगाचे समूळ उच्चाटन करण्याचे लक्ष, केंद्र शासनाने निर्धारित केले आहे. शेतक-यांचे व्यापक हिताच्या दृष्टीने जिल्हयातील सर्व शेतकरी पशुपालकांनी त्यांचे पशुधनास टॅगींग करुन लसीकरण करुन घेणे बंधनकारक सू पशुसंवर्धन विभागास संपर्क साधुन सहकार्य असे आवाहनही जिल्हाधिकारी श्री. देसाई यांनी केले आहे.

000000

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.