कोल्हापूर, दि. 16 (जिल्हा माहिती कार्यालय) : पोस्टमास्टर
जनरल गोवा रिजन पणजी कार्यालयामध्ये 28 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वा.45 व्या डाक
अदालतीचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती प्रवर अधीक्षक ईश्वर पाटील यांनी
दिली.
गोवा रिजनशी संबंधित पोस्टाच्या सेवेविषयी किंवा
कामकाजाबद्दल ज्या तक्रारींचे निवारण सहा आठवड्याच्या आत झालेले नसेल व समाधानकारक
उत्तर मिळाले नसेल अशा तक्रारींची या डाक अदालतमध्ये दखल घेतली जाईल. विशेषत: टपाल
वस्तू / मनीऑर्डर/ बचत खाते/ प्रमाणपत्र इत्यादी बाबतच्या तक्रारी विचारात घेतल्या
जातील. तक्रारींचा उल्लेख सर्व तपशीलासह केलेला असावा. उदा. तारीख व ज्या
अधिकाऱ्यास मूळ तक्रार पाठविली असेल त्याचे नाव, हुद्दा इत्यादी.
संबंधितांनी डाक सेवेबाबतची आपली तक्रार डाक सेवाचे सहायक
निर्देशक के. बालाराजू आणि सचिव डाक अदालत, पोस्टमास्टर जनरल यांचे कार्यालय, गोवा
रिजन पणजी 403001 यांच्या नावे दोन प्रतींसह दि. 18 सप्टेंबर पर्यंत अथवा
तत्पूर्वी पोहचतील अशा रितीने पाठवावी. त्यानंतर आलेल्या तक्रारींची या डाक
अदालतीमध्ये दखल घेतली जाणार नाही.
00000
No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.