** जिल्हा माहिती कार्यालयाच्या संकेतस्थळावर आपले स्वागत ** बातम्या, लेख, पर्यटन विषयक माहिती, पत्रकारांसाठीच्या विविध योजना, लोकराज्यसह इतर **

Monday, September 14, 2020

माझे कुटुंब, माझी जबाबदारी मोहीम मधुमेह, उच्चरक्तदाब, ह्दयरोग आजार असलेल्या व्यक्तींचे सर्व्हेक्षण करणार - आरोग्य सभापती हंबीरराव पाटील प्रत्येक व्यक्तीची गृहभेटीव्दारे तापमान व SPO2 तपासणी करण्यात येणार

     कोल्हापूर, दि. 14 (जिल्हा माहिती कार्यालय) : कोविड-19 विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात 15 सप्टेंबरपासून माझे कुटुंब, माझी जबाबदारी ही मोहीम राबविण्यात येणार आहे. जिल्ह्यात ही मोहीम पहिल्या फेरीत 15 सप्टेंबर ते 10 ऑक्टोबर  दुसऱ्या फेरीत 14 ते 24 ऑक्टोबर 2020 या कालावधीत राबविण्यात येणार आहे. ही मोहीम लोकसहभागासाठी असून या मोहिमेमध्ये आरोग्य शिक्षण, महत्वाचे आरोग्य संदेश, मधुमेह, उच्चरक्तदाब, ह्दयरोग, किडनी विकार यासारख्या आजार असलेल्या व्यक्तींचे सर्व्हेक्षण करण्यात येणार असल्याचे जिल्हा परिषदेचे आरोग्य सभापती हंबीरराव पाटील यांनी कळविले आहे.  

          या मोहिम कालावधीमध्ये 2794573 ग्रामीण लोकसंख्येतील 656741 घरांना गृहभेटी देण्यासाठी 1235 इतके आरोग्य पथक तयार करण्यात आलेले आहे. प्रत्येक पथकात तीन सदस्य आहेत.  आरोग्य पथक दररोज ५० घरांना भेटी देईल. या भेटी दरम्यान घरातील सर्व सदस्यांचे तापमान, SP-O2, तमासणे, तसेच comorbid condition आहे का यांची माहिती घेण्यात येईल.  ताप, खोकला, दम लागणे, SPO2 कमी असे कोव्हिड-19 सदृश्य लक्षण आसणाऱ्या रुग्णांना जवळच्या ताप उपचार केंद्रामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात येणार आहे.

             ताप उपचार केंद्रामध्ये कोव्हिड-१९ ची प्रयोगशाळा चाचणी करून उपचार केले जातील. comorbid condition असलेले रुग्ण नियमित उपचार घेतात का या बाबत खात्री केली जाईल आणि आवश्यक ते उपचार करण्यात येतील. प्रत्येक ५ ते १० आरोग्य पथकामागे एका डॉक्टराची नेमणूक करण्यात आलेली आहे.  त्यांच्या मार्फत उपचार केले जातील.  घरातीत सर्व सदस्यांना कोव्हिड-19 पूर्व कोव्हिड-19 दरम्यान आणि कोव्हिड-19 नंतर या बाबतच्या आरोग्यसंदेश समजावून सांगितले जाणार आहे.

            या मोहिमेत उत्कृष्ठ काम करणाऱ्या ग्रामपंचायतींना प्रोत्साहनपर बक्षीस देण्यात येणार आहे. बक्षीसाचे  स्वरुप याप्रमाणे

अ.क्र

बक्षिस

राज्यस्तर

जिल्हास्तर

महानगरपालिका स्तर

मा.आमदार मतदार संघस्तर

1

1 ले बक्षिस

1 लाख

50 हजार

50 हजार

10 हजार

2

2 ले बक्षिस

50 हजार

30 हजार

30 हजार

5 हजार

3

3 ले बक्षिस

30 हजार

20 हजार

20 हजार

3 हजार

 

            लोकप्रतिनिधींनी आपल्या मतदारसंघातील सर्व ग्रामस्थांना या माहिमेत सहभागी होण्यसाठी प्रेरीत करावे व आजाराला हरविण्यासाठी महत्वाची भूमिका पार पाडावी. मोहिमेमध्ये घर, कुटुंब, परिसर, गाव, शहर, समाज आणि देशाच्या हितासाठी तोंडावर मास्कलावणे, शारीरिक अंतराचे पालन करणे, वारंवार हात साबणाने धुणे, कमीत कमी प्रवास करणे, घरी राहणे, याबाबतची जनजागृती करावी. सर्वजण एकजुटीने, जागरुकपणे, संयमाने व धीराने या संकटाचा सामना करुया व माझे कुटुंब माझी जबाबदारी हे कर्तव्यपार पाडूया. प्रत्येक आरोग्य पथकाला सर्वातोपरी सहकार्य करावे, असे आवाहनही श्री. पाटील यांनी केले आहे.

00000

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.