कोल्हापूर, दि. 15 (जिल्हा माहिती कार्यालय): जिल्ह्यातील
सर्व व्यावसायिकांनी त्यांच्याकडे तळून राहिलेले / गळती झाल्यामुळे अथवा अन्य
कारणामुळे शिल्लक राहिलेले व मानवी सेवनास नसणारे खाद्यतेल हे त्यापासून बायोडिझेल
तयार करण्यासाठी प्राधिकृत केलेल्या एजन्सीजना देण्यासाठी अन्न व औषध प्रशासन
कार्यालयास तातडीने माहिती सादर करण्याचे आवाहन अन्न व औषध प्रशासन विभागाचे
सहाय्यक आयुक्त मोहन केंबळकर यांनी केले आहे.
जिल्ह्यातील तमाम हॉटेल
व्यावसायिक, नमकिन-फरसाण व तत्सम खाद्यपदार्थ उत्पादक, त्याचप्रमाणे असे
व्यावसायिक जे दरदिवशी 50 लीटर अथवा त्यापेक्षा जास्त खाद्यतेलाचा वापर
खाद्यपदार्थ तळण्यासाठी करतात, त्यांनी खाद्यतेलाचा पुर्नवापर टाळण्यासाठी ते
वापरत असलेल्या खाद्यतेलाचा अभिलेखा/ नोंद (रेकॉर्ड) ठेवणे अनिवार्य आहे. तसेच असे
खाद्यतेल व्यावसायिक ज्यांच्याकडे प्रक्रियेदरम्यान वेस्ट राहिलेले / मानवी सेवनास
नसणारे अथवा व्यवसाय करीत असताना डब्यांची गळती झाल्यामुळे अथवा अन्य कारणामुळे
शिल्लक राहिलेल्या व मानवी सेवनास नसणाऱ्या खाद्यतेलाचा पुनर्वापर टाळण्यासाठी
त्यांनीही खाद्यतेलाचा अभिलेखा / नोंद (रेकॉर्ड) ठेवणे अनिवार्य आहे.
जे व्यावसायिक खाद्यतेलाचा
पुनर्वापर करीत असल्याचे आढळून येतील त्यांच्यावर अन्न सुरक्षा व मानके कायदा,
2006 अन्वये कडक कारवाई करण्यात येईल, असेही त्यांनी कळविले आहे.
00000
No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.