** जिल्हा माहिती कार्यालयाच्या संकेतस्थळावर आपले स्वागत ** बातम्या, लेख, पर्यटन विषयक माहिती, पत्रकारांसाठीच्या विविध योजना, लोकराज्यसह इतर **

Friday, September 18, 2020

आजअखेर 26 हजार 257 जणांना डिस्चार्ज -डॉ. बी. सी. केम्पी पाटील

 


   कोल्हापूर, दि. 18 (जिल्हा माहिती कार्यालय) : आज संध्याकाळी 5 वाजेपर्यंत आरटीपीसीआर आणि सीबीएनएएटी चाचणीचे 1 हजार 223 प्राप्त अहवालापैकी 944 निगेटिव्ह तर 279 अहवाल पॉझीटिव्ह आहेत. अॅन्टीजेन टेस्टिंग चाचणीचे 329 प्राप्त अहवालापैकी निगेटिव्ह 269 तर 60 पॉझीटिव्ह (107 निगेटिव्ह अहवाल आरटीपीसीआरसाठी तपासणीसाठी पाठविले), खासगी रुग्णालये/लॅब मध्ये 638 प्राप्त अहवालापैकी 352 निगेटिव्ह तर 286 पॉझीटिव्ह  असे एकूण 625 अहवाल पॉझीटिव्ह आहेत.

जिल्ह्यात आजअखेर एकूण 38 हजार 279 पॉझीटिव्हपैकी 26 हजार 257 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आजअखेर जिल्ह्यात एकूण 10 हजार 826 पॉझीटिव्ह रुग्ण आहेत, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बी. सी. केम्पी-पाटील यांनी आज दिली.

आज संध्याकाळी 5 वाजेपर्यंत प्राप्त 625 पॉझीटिव्ह अहवालापैकी आजरा-12, भुदरगड- 53, चंदगड-25 गडहिंग्लज-21, गगनबावडा- 1, हातकणंगले- 63, कागल-13, करवीर-70, पन्हाळा- 33, राधानगरी- 14, शाहूवाडी-17, शिरोळ- 13, नगरपरिषद क्षेत्र- 44, कोल्हापूर महापालिका क्षेत्र- 151 व इतर शहरे व राज्य 95 असा समावेश आहे.

आजअखेर तालुका, नपा आणि मनपा क्षेत्रनिहाय रुग्णांची संख्या पुढीलप्रमाणे - आजरा-694, भुदरगड- 901, चंदगड- 815, गडहिंग्लज- 911, गगनबावडा- 105, हातकणंगले-4311, कागल-1327, करवीर-4307, पन्हाळा- 1435, राधानगरी-1040, शाहूवाडी-973, शिरोळ- 2074, नगरपरिषद क्षेत्र-6004, कोल्हापूर महापालिका क्षेत्र- 11 हजार 929 असे एकूण  36 हजार 826 आणि इतर जिल्हा व राज्यातील – 1 हजार 453 असे मिळून एकूण 38  हजार 279  रुग्णांची आजअखेर जिल्ह्यात संख्या आहे.

            जिल्ह्यातील एकूण 38 हजार 279 पॉझीटिव्ह रूग्णांपैकी 26 हजार 257 रूग्णांना डिस्चार्ज मिळाला आहे. तर एकूण 1 हजार 196 जणांचा मृत्यू झाला असल्यामुळे आजअखेर उपचारार्थ दाखल झालेल्या जिल्ह्यातील रूग्णांची संख्या 10 हजार 826 इतकी आहे.

0000000

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.