** जिल्हा माहिती कार्यालयाच्या संकेतस्थळावर आपले स्वागत ** बातम्या, लेख, पर्यटन विषयक माहिती, पत्रकारांसाठीच्या विविध योजना, लोकराज्यसह इतर **

Wednesday, September 23, 2020

आजअखेर 30 हजार 272 जणांना डिस्चार्ज -डॉ. बी. सी. केम्पी पाटील

 


   कोल्हापूर, दि. 23 (जिल्हा माहिती कार्यालय) : आज संध्याकाळी 5 वाजेपर्यंत आरटीपीसीआर आणि सीबीएनएएटी चाचणीचे 1 हजार 100 प्राप्त अहवालापैकी 724 निगेटिव्ह तर 340 अहवाल पॉझीटिव्ह आहेत (36 अहवाल नाकारण्यात आले). अॅन्टीजेन टेस्टिंग चाचणीचे 383 प्राप्त अहवालापैकी 72 पॉझीटिव्ह (101 निगेटिव्ह अहवाल आरटीपीसीआरसाठी तपासणीसाठी पाठविले), खासगी रुग्णालये/लॅब मध्ये 587 प्राप्त अहवालापैकी 285 निगेटिव्ह तर 302 पॉझीटिव्ह  असे एकूण 714 अहवाल पॉझीटिव्ह आहेत.

जिल्ह्यात आजअखेर एकूण 41 हजार 449 पॉझीटिव्हपैकी 30 हजार 272 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आजअखेर जिल्ह्यात एकूण 9 हजार 855 पॉझीटिव्ह रुग्ण आहेत, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बी. सी. केम्पी-पाटील यांनी आज दिली.

आज संध्याकाळी 5 वाजेपर्यंत प्राप्त 714 पॉझीटिव्ह अहवालापैकी आजरा-9, भुदरगड- 11, चंदगड-22, गडहिंग्लज-33, गगनबावडा-1,  हातकणंगले- 59, कागल-14, करवीर-120, पन्हाळा- 29, राधानगरी-21, शाहूवाडी-36, शिरोळ- 15, नगरपरिषद क्षेत्र- 51, कोल्हापूर महापालिका क्षेत्र- 200 व इतर शहरे व राज्य 93 असा समावेश आहे.

आजअखेर तालुका,नपा आणि मनपा क्षेत्रनिहाय रुग्णांची संख्या पुढीलप्रमाणे - आजरा-728, भुदरगड- 1007, चंदगड- 898, गडहिंग्लज- 1066, गगनबावडा- 121, हातकणंगले-4587, कागल-1448, करवीर-4759, पन्हाळा- 1602, राधानगरी-1110, शाहूवाडी-1099, शिरोळ- 2194, नगरपरिषद क्षेत्र-6386, कोल्हापूर महापालिका क्षेत्र- 12 हजार 761 असे एकूण  39 हजार 766 आणि इतर जिल्हा व राज्यातील – 1 हजार 683 असे मिळून एकूण 41  हजार 449  रुग्णांची आजअखेर जिल्ह्यात संख्या आहे.

            जिल्ह्यातील एकूण 41 हजार 449 पॉझीटिव्ह रूग्णांपैकी 30 हजार 272 रूग्णांना डिस्चार्ज मिळाला आहे. तर एकूण 1 हजार 322 जणांचा मृत्यू झाला असल्यामुळे आजअखेर उपचारार्थ दाखल झालेल्या जिल्ह्यातील रूग्णांची संख्या 9 हजार 855 इतकी आहे.

0000000

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.