** जिल्हा माहिती कार्यालयाच्या संकेतस्थळावर आपले स्वागत ** बातम्या, लेख, पर्यटन विषयक माहिती, पत्रकारांसाठीच्या विविध योजना, लोकराज्यसह इतर **

Monday, September 14, 2020

29 सप्टेंबर रोजी डाक अदालतीचे आयोजन


कोल्हापूर, दि. 14 (जिल्हा माहिती कार्यालय) : प्रवर अधीक्षक डाकघर, कोल्हापूर येथे दि. 29 सप्टेंबर रोजी दुपारी 3 वा. डाक अदालत आयोजित करण्यात आली असल्याची माहिती प्रवर अधीक्षक ईश्वर पाटील यांनी दिली.

कोल्हापूर डाकघर विभागाशी संबंधित पोस्टाच्या सेवेविषयी किंवा कामकाजाबद्दल ज्या तक्रारींचे निवारण सहा आठवड्यांच्या आत झालेले नसेल व समाधानकारक उत्तर मिळाले नसेल अशा तक्रारींची या डाक अदालतमध्ये दखल घेतली जाईल. विशेषत: टपाल वस्तू, मनीऑर्डर, बचत खाते, प्रमाणपत्र इत्यादी बाबतच्या तक्रारी विचारात घेतल्या जातील. तक्रारींचा उल्लेख सर्व तपशीलासह  केलेला असावा. उदा. तारीख व ज्या अधिकाऱ्यास मूळ तक्रार पाठविली असेल त्याचे नाव, हुद्दा इत्यादी संबंधितांनी डाक सेवेबाबतची आपली तक्रार आय. डी. पाटील, प्रवर अधीक्षक डाकघर, कोल्हापूर विभाग, कोल्हापूर 416003 यांच्या नावे दोन प्रतींसह दि. 24 सप्टेंबर पर्यंत अथवा तत्पूर्वी पोहोचेल अशा रितीने पाठवावी. त्यानंतर आलेल्या तक्रारींची या डाक अदालतीमध्ये दखल घेतली जाणार नाही.

00000

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.