कोल्हापूर,
दि. 12 (जिल्हा माहिती कार्यालय) : आज संध्याकाळी 5 वाजेपर्यंत आरटीपीसीआर आणि
सीबीएनएएटी चाचणीचे 1 हजार 939 प्राप्त अहवालापैकी 1 हजार 538 निगेटिव्ह तर 362
अहवाल पॉझीटिव्ह आहेत. (1 अलवाह प्रलंबित, 2 अहवाल पाठपुराव्याने पोझिटिव्ह व 36
अहवाल नाकारण्यात आले), अॅन्टीजेन टेस्टिंग चाचणीचे 394 प्राप्त अहवालापैकी
निगेटिव्ह 348 तर 46 पॉझीटिव्ह (118 निगेटिव्ह अहवाल आरटीपीसीआरसाठी तपासणीसाठी
पाठविले), खासगी रुग्णालये/लॅब मधील 371 पॉझीटिव्ह आले असे एकूण 779 अहवाल
पॉझीटिव्ह आहेत.
जिल्ह्यात
आजअखेर एकूण 33 हजार 890 पॉझीटिव्हपैकी 22 हजार 111 जणांना डिस्चार्ज देण्यात आला
आहे. आजअखेर जिल्ह्यात एकूण 10 हजार 751 पॉझीटिव्ह रुग्ण आहेत, अशी माहिती जिल्हा
शल्यचिकित्सक डॉ. बी. सी. केम्पी-पाटील यांनी आज दिली.
आज
संध्याकाळी 5 वाजेपर्यंत प्राप्त 779 पॉझीटिव्ह अहवालापैकी आजरा-10, भुदरगड- 35,
चंदगड-1, गडहिंग्लज-6, गगनबावडा- 3, हातकणंगले- 65, कागल-34, करवीर-123, पन्हाळा- 42,
राधानगरी- 29, शाहूवाडी-22, शिरोळ- 30, नगरपरिषद क्षेत्र- 89, कोल्हापूर महापालिका
क्षेत्र- 239 व इतर शहरे व राज्य 51 असा समावेश आहे.
आजअखेर तालुका,
नपा आणि मनपा क्षेत्रनिहाय रुग्णांची संख्या पुढीलप्रमाणे - आजरा-585, भुदरगड- 754,
चंदगड- 713, गडहिंग्लज- 777, गगनबावडा- 94, हातकणंगले-3908, कागल-1157, करवीर-3741,
पन्हाळा- 1208, राधानगरी- 896, शाहूवाडी- 788, शिरोळ- 1845, नगरपरिषद क्षेत्र-5557,
कोल्हापूर महापालिका क्षेत्र- 10 हजार 772 असे एकूण
32 हजार 795 आणि इतर जिल्हा व राज्यातील – 1 हजार 95 असे मिळून एकूण 33 हजार 890 रुग्णांची आजअखेर जिल्ह्यात संख्या
आहे.
जिल्ह्यातील एकूण 33 हजार 890 पॉझीटिव्ह रूग्णांपैकी
21 हजार 111 रूग्णांना डिस्चार्ज मिळाला आहे. तर एकूण 1 हजार 28 जणांचा मृत्यू
झाला असल्यामुळे आजअखेर उपचारार्थ दाखल झालेल्या जिल्ह्यातील रूग्णांची संख्या 10
हजार 751 इतकी आहे.
0000000
No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.