कोल्हापूर, दि. 9 (जिल्हा माहिती कार्यालय) :
जिल्ह्यातील कुरुंदवाड नगरपरिषदेने आज विना मास्क फिरणाऱ्या 65 जणांकडून 6 हजार 500
रुपयांचा दंड वसूल केला आहे.
कुरुंदवाड
नगरपरिषदेने तीन पथकाची स्थापना करुन विना मास्क फिरणाऱ्या नागरिकांवर कारवाई सुरु
केली आहे. आजअखेर 1 हजार 95 जणांकडून 1 लाख 9 हजार 500 रुपये दंडाची वसुली केली
आहे.
चंदगड नगरपंचायतीकडून विना
मास्क फिरणाऱ्या 6 नागरिकांकडून 700 रुपये दंड वसूल केला आहे.
गडहिंग्लज नगरपरिषदेकडून
आज विना मास्क फिरणाऱ्या 10 नागरिकांकडून 1200 रुपये दंड वसूल केला आहे. आज पर्यंत
1820 नागरिकांकडून 2 लाख 67 हजार 900 रुपये दंड वसूल केला आहे.
जयसिंपूर नगरपरिषदेमार्फत 6
विना मास्क व्यक्तींकडून आजच्या दिवशी 600 रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. आज
अखेर विना मास्क 1071 व्यक्तींकडून 1 लाख 10 हजार 380 रुपये, सार्वजनिक ठिकाणी
थुंकणाऱ्या एक व्यक्तीकडून 70 रुपये दंड वसूली केला.
No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.