कोल्हापूर, दि. 3 (जिल्हा माहिती कार्यालय): प्रत्येक
रुग्णांचे जास्ती जास्त हाय रिस्क संपर्क शोधण्यात यावेत. या सूचनेबरोबर
कोव्हिड-19 साथीच्या अनुषंगाने अंमलबजाणीमध्ये सुधारणा करावी, अशी सूचना सार्वजनिक
आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी केली आहे. या संदर्भात प्र.
निवासी उप जिल्हाधिकारी दत्तात्रय कवितके यांनी आज पत्र पाठविले आहे.
प्र. निवासी
उप जिल्हाधिकारी दत्तात्रय कवितके यांनी कोल्हापूर महानगरपालिकेचे आयुक्त, जिल्हा
परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, आरोगय सेवा उपसंचालक, राजर्षी छत्रपती शाहू
महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालायचे अधिष्ठाता, जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा
आरोग्य अधिकारी, एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी, जिल्हा उद्योग केंद्राचे
महाव्यवस्थापक, सर्व उपविभागीय अधिकारी, सर्व तहसिलदार, सर्व गट विकास अधिकारी,
मुख्याधिकारी नगरपालिका, नगरपरिषद, नगरपंचायत , सर्व वैद्यकीय अधिक्षक
ग्रामीण/उपजिल्हा रुग्णालय, सर्व तालुका आरोग्य अधिकारी, सर्व वैद्यकीय अधिकारी,
प्राथमिक आरोग्य केंद्र व सर्व प्रभारी अधिकारी कोव्हिड केंद्र यांना पाठविलेल्या
पत्रात असे नमुद आहे.
(अ) Community level actions:
(१) जिल्हयामध्ये Contact tracing बहुतेक सर्व रुग्णांचे पूर्ण करण्यात आले
आहे. तथापि शहर व ग्रामीण भागामध्ये प्रत्येक कोव्हिड-१९ रुग्णांच्या मागे
शोधण्यास आलेले High Risk contacts, Low Risk contacts यांची सरासरी संख्या
अनुक्रमे 3.4 व 1.0 एवढी असल्याचे आढळून आले आहे. ही संख्या अत्यंत कमी आहे.
त्यामुळे प्रत्येक रुग्णांचे जास्ती जास्त High Risk contacts शोधण्यात यावेत.
(२) High Risk contacts शोधत असताना फक्त घरामध्ये एकत्रित राहणाऱ्या High
rish contacts वर भर देण्यात आलेला आहे. परंतु कामाच्या ठिकाणी संपर्कात आलेल्या व्यक्तींची
माहिती घेतली गेलेली नाही. त्यामुळे सर्व High Risk Contacts शोधले जातील याबाबत खात्री करावी.
(3) Positive cases आढळून आल्यानंतर Containment Zone निश्चित करण्यात
येतो. या Containment Zone मध्ये दररोज १४ दिवसांपर्यंत घरोघर फिरुन सर्व्हेक्षण
करणे आवश्यक आहे. तथापिक, असे निदर्शनास आले आहे की, या टीम्स Containment Zore
मध्ये दररोज भेट देत नाहीत.
(4) Containment Zone मध्ये परिणामकारकरित्या सर्व्हे होणे आवश्यक आहे.
त्यानुसार ILI/SARI चे रुग्ण आढळून येणे, त्याचे निदान करणे, त्याचे रिपोर्टिंग
करणे आवश्यक आहे. तथापि आपल्या Containment Zone च्या सर्व्हेक्षणामध्ये SARI रुग्ण
आढळून येत नाहीत तसेच ILI रुग्ण सुध्दा अत्यंत कमी प्रमाणात रिपोर्ट केले जात
आहेत. Containment Zone मधील सर्व्हेक्षण गुणवत्तेनुसार होणे आवश्यक आहे.
(5) रुगणांचे निदान झाल्यानंतर २४ तासामध्ये Contact tracing करणे, संपर्कात
आलेल्या सर्व High risk contacts ची
माहिती घेणे, Contaminent Zone निश्चित करून दररोज घरोघरी सर्व्हेक्षण करणे या कार्यक्षेत्रामध्ये
ILI/SARI चे रुग्ण शोधणे तसेच या कार्यक्षेत्रामध्ये Comorbid सर्व्हेक्षण करणे
अत्यंत आहे. या दृष्टीने आपल्या सर्व यंत्रणेला याबाबत सूचना देण्यात याव्यात.
(ब) Hospital level actions:
(१) जिल्हयामध्ने CPR Hospital, इचलकरंजी व गडहिंग्लज येथील उप जिल्हा
रुग्णालये व काही खासगी रुग्णालयांना DCH म्हणून निश्चित केलेले आहे. रुग्णांची वाढती
संख्या पाहता खासगी रुग्णालय अधिग्रहित करुन
दिलेल्या सूचनेनुसार त्या ठिकाणी कोव्हिड-१९ रुग्णांना दाखल करून त्यांचेवर
उपचार करणे आवश्यक आहे.
(2) महानगरपालिकेचे कोणतेही रुग्णालय DCH म्हणून निश्चित केलेले नाही.
सध्या कार्यान्वित असलेल्या महागनरपालिचे रुग्णालय
DCH म्हणून निश्चित करावे व रुग्णांना दाखल करुन उपचार त्वरित सुरु करावेत.
(3) DCH म्हणून निश्चित केलेल्या रुग्णालयांमध्ये सर्व प्रयोगशाळा तपासण्या
उपलब्ध असाव्यात, यासाठी Inhouse सुविधा उपलब्ध नसल्यास Outsource करणे आवश्यक आहे.
Serum Creatinine .D-Dimmer LDH, CRP. ABG या तपासण्या त्वरीत उपलब्ध करुन देणे आवश्यक
आहे.
(4) Oxygen देण्याच्या सुविधेमध्ये वाढ होणे आवश्यक आहे. कारण रुग्णांना
देण्याच्या उपचारामध्ये Oxygen Management ही सर्वात महत्वाची आहे. त्या दृष्टीने
Dura Cylinders Oxygen Tank उपलब्ध होण्याकरिता कार्यवाही करण्यात यावी.
5)
रुग्णांना द्यावयाच्या
उपचारासाठी Standard Treatment protocol वेळोवेळी अद्ययावत करुन राज्य स्तरावरुन
सर्व जिल्ह्यांना कळविण्यात आलेले आहे. या protocol चा वापर सर्व आरोग्य
संस्थांमध्ये होणे आवश्यक आहे. व त्यासाठीची औषधे सुध्दा उपलब्ध होतील यावर लक्ष
देणे आवश्यक आहे.
6) राज्यस्तरावरुन 15 दिवसानंतर किती रुग्ण असण्याची शक्यता आहे याबाबत
Prediction वरुन Infrastructure Development बाबत नियमितपणे कळविण्यात येते.
(7) शासकीय रुग्णालयांमध्ये ज्या ठिकाणी DCH केलेले आहे त्या ठिकाणी
विशेषज्ञ उपलब्ध
नसल्यास खासगी विशेषज्ञ उपलब्ध करुन देणे आवश्यक आहे. यासाठी त्या त्या
कार्यक्षेत्रातील
उपलब्ध विशेषज्ञांना दिवस निश्चित करून द्यावेत व त्यानुसार सेवा उपलब्ध
करून देण्याबाबत
सक्त सूचना देण्यात याव्यात. या सूचनांची अंमलबजावणी न करणाऱ्या विशेषज्ञावर आपल्या स्तरावरुन आवश्यक ती कार्यवाही करण्यात
यावी.
(क) Software मध्ये Data entry. Reporting इ.
(1) CVAnalytics portal मधील कोव्हिड-११, रुग्णांची Line List Download करुन त्यानुसार दररोज
रिपोर्टिंग वेळेवर होणे आवश्यक आहे.
(२) जिल्ह्यामधील मृत्यू व डिचार्ज या दोन्हीची माहिती Facility App मधून कोव्हिड-१९
Portal वर दररोज Update होणे आवश्यक आहे. तथापि, असे निदर्शनास आले आहे की कोव्हिड-१९ चे सर्व मृत्यू पोर्टल वर अपडेट
केले जात नाहीत. खासगी व शासकीय रुग्णालयामध्ये होणारा प्रत्येक मृत्यू हा २४
तासाच्या आत कोव्हिड पोर्टलमध्ये अपडेट होईल याबाबत खात्री करावी
(ड) इतरः
जिल्ह्याचा Growth Rate वाढत असून सध्या तो 4.6 एवढा आहे. त्याच प्रमाणे Doubling
rate कमी होत असून तो सध्या २१.५ आहे. या बरोबरच मृत्युदर २.५ एवढा आहे. या सर्व दर्शकांचा
आपल्या स्तरावरून आढावा घेण्यात यावा व त्यानुसार कोव्हिड-१९ रुग्णांची संख्या तसेच मृत्यु दर कमी
करण्यासाठी आपल्या स्तरावरून जास्तीत जास्त प्रयत्न करण्यात यावे.
00 0 0 0 0 0
No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.