** जिल्हा माहिती कार्यालयाच्या संकेतस्थळावर आपले स्वागत ** बातम्या, लेख, पर्यटन विषयक माहिती, पत्रकारांसाठीच्या विविध योजना, लोकराज्यसह इतर **

Thursday, May 21, 2020

जिल्ह्यासाठी दिलासादायक ; 1638 अहवाल निगेटिव्ह



कोल्हापूर,दि. 21 (जिल्हा माहिती कार्यालय):  काल दिनांक 20 मे रोजी रात्री 8.30 पर्यत 1295 आणि आज सकाळी 10 वाजेपर्यंत 343 असे एकूण 1638 अहवाल निगेटिव्ह आले आहेत. ही जिल्ह्यासाठी दिलासादायक बातमी आहे.
       जिल्ह्यातील सीपीआर, आयजीएम, डॉ. डी. वाय. पाटील, आयसोलेशन हॉस्पीटल या प्रमुख हॉस्पीटलसह गडहिंग्लज, चंदगड, आजरा, राधानगरी, हातकणंगले, कागल, भूदरगड, गगनबावडा, पन्हाळा, शाहूवाडी, शिरोळ, अतिग्रे येथील संजय गोडावत हॉस्टेल, अॅपल हॉस्पीटल आणि आधार हॉस्पीटल या एकूण 18 ठिकाणी स्वॅब कलेक्शन करण्यात येते.
          काल रात्री 8.30 पर्यंत प्राप्त झालेल्या 1338 अहवालांपैकी 1295 तर आज सकाळी 10 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या  346 अहवालांपैकी 343 अहवाल निगेटिव्ह आले आहेत.  ही दिलासा देणारी बाब आहे.
00000

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.