** जिल्हा माहिती कार्यालयाच्या संकेतस्थळावर आपले स्वागत ** बातम्या, लेख, पर्यटन विषयक माहिती, पत्रकारांसाठीच्या विविध योजना, लोकराज्यसह इतर **

Tuesday, May 26, 2020

एकही पॉझिटिव्ह रुग्ण नाही जिल्ह्याला मोठा दिलासा -डॉ. बी. सी. केम्पी पाटील



कोल्हापूर,दि. 26 (जिल्हा माहिती कार्यालय): काल सकाळी 10 ते आज रात्री 8 पर्यंत 1762 प्राप्त अहवालापैकी 1696 अहवाल निगेटिव्ह (सिंधुदुर्गचे 66 अहवाल निगेटिव्ह) आहेत. आज जिल्ह्यातील एकही अहवाल पॉझीटिव्ह आलेला नाही. हा मोठा दिलासा आहे. आजअखेर जिल्ह्यात एकूण 378 पॉझीटिव्ह रुग्ण आहेत, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बी. सी. केम्पी-पाटील यांनी आज दिली.
 आजअखेर तालुका, नपा आणि मनपा क्षेत्रनिहाय रुग्णांची संख्या पुढीलप्रमाणे - आजरा- 32, भुदरगड- 49, चंदगड- 25, गडहिंग्लज- 13, गगनबावडा- 6, हातकणंगले- 4, कागल- 11, करवीर- 11, पन्हाळा- 20, राधानगरी- 48, शाहूवाडी- 119, शिरोळ- 5, नगरपरिषद क्षेत्र- 10, कोल्हापूर महापालिका क्षेत्र-20 असे एकूण 373 आणि पुणे -1,  सोलापूर-1, कर्नाटक-2 आणि आंध्रप्रदेश-1 इतर जिल्हा व राज्यातील पाच असे मिळून एकूण 378 रुग्णांची आजअखेर जिल्ह्यात संख्या आहे.
00000

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.