** जिल्हा माहिती कार्यालयाच्या संकेतस्थळावर आपले स्वागत ** बातम्या, लेख, पर्यटन विषयक माहिती, पत्रकारांसाठीच्या विविध योजना, लोकराज्यसह इतर **

Tuesday, May 19, 2020

दिव्यांगांसाठी व्यवसाय प्रशिक्षण कार्यशाळा ऑनलाईन प्रवेश सुरू - रूबीन लोखंडे



 कोल्हापूर, दि. 19 (जिल्हा माहिती कार्यालय)  : हॅन्डीकॅप बहुउद्देशिय शिक्षण प्रसारक मंडळ कोल्हापूर संचलित हॅन्डीकॅप व्यवसाय प्रशिक्षण व रोजगार उद्योग केंद्र कोल्हापूर यांच्या शासनमान्य कार्यशाळेत दिव्यांगासाठी व्यवसाय प्रशिक्षण अभ्यासक्रम शिकविले जातात. या कार्यशाळेत शिवणकाम, कॉप्युटर कोर्स, मराठी व इंग्रजी टंकलेखन, बागकाम इ. अभ्यासक्रम मोफत शिकविले जातात. दिव्यांग मुलांना प्रवेश घेण्याचे वय 18 ते 25 असून जे प्रशिक्षणार्थीय बाहेर गावचे आहेत त्यांच्यासाठी जेवण व राहणेची उत्तम व मोफत सोय संस्थेमार्फत करणेत आली आहे.
को‍व्हिड 19 या आजाराच्या प्रतिबंधात्मक सुरक्षिततेसाठी प्रशिक्षणार्थीसाठी ऑनलाईन https://forms.gle/c7ruFnjE2VfAxhNc9 या संकेतस्थळावर प्रवेश निश्चित करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
अधिक माहितीसाठी रूबीन लोखंडे 8857896445 किंवा राहूल इनामदार 9860034414 किंवा दूरध्वनी क्र. 0231-2639991 या क्रमांकावर संपर्क साधावा. जास्तीत जास्त दिव्यांग बांधवांनी सदर प्रवेश घेवून याचा लाभ घ्यावा असे आवाहन संस्थेचे संस्थापक रूबीन लोखंडे यांनी केले आहे.
00000


No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.