** जिल्हा माहिती कार्यालयाच्या संकेतस्थळावर आपले स्वागत ** बातम्या, लेख, पर्यटन विषयक माहिती, पत्रकारांसाठीच्या विविध योजना, लोकराज्यसह इतर **

Wednesday, May 13, 2020

जिल्ह्यातील 9 निवारागृहांमध्ये राज्यातील 64 परराज्यातील 122 -जिल्हाधिकारी दौलत देसाई




       कोल्हापूर, दि. 13 (जिल्हा माहिती कार्यालय)  : जिल्ह्यातील 9 निवारागृहांमध्ये राज्यातील 64 आणि परराज्यातील 122 अशा एकूण 186 जणांची सोय करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिली.
        कोल्हापूर महानगरपालिका क्षेत्रात शेठ रुईया विद्यालय, मंगळवार पेठ येथे राज्यातील  17 परराज्यातील 8 अशा 25 जणांचा समावेश असून याची क्षमता 50 जणांची आहे. रामकृष्ण हॉल, लोणार वसाहत राज्यातील 8 परराज्यातील 11 अशा 19 जणांचा समावेश असून याची क्षमता 50 जणांची आहे.
       करवीर - सरस्वती मंगल कार्यालय उजळाईवाडी  येथे राज्यातील 1 परराज्यातील 33 एकूण 34 जण असून क्षमता 70 जणांची आहे. डी. फार्मसी कॉलेज उजळाईवाडी - परराज्यातील 41 असे एकूण 41 असून याची एकूण क्षमता 50 जणांची आहे.
          कागल - श्रीमंत जयसिंगराव घाटगे विद्यालय येथे राज्यातील 1 परराज्यातील 11 असे एकूण 12 जण असून क्षमता 300 जणांची आहे.
        हातकणंगले - अशोकराव माने ग्रुप वाठार तर्फ वडगाव राज्यातील 2 परराज्यातील 8 असे एकूण 10 जण असून क्षमता 115 जणांची आहे. शहरी बेघर निवारा केंद्र इचलकरंजी येथे राज्यातील 21 परराज्यातील 10 एकूण 31 जण असून क्षमता 55 जणांची आहे. 
          शिरोळ- शाळा क्रमांक 1 जयसिंगपूर येथे राज्यातील 11 असे एकूण 11 क्षमता 50 आहे.
          गगनबावडा- समाज कल्याण निवासी शाळा वसतीगृह गगनबावडा येथे राज्यातील 3 असे एकूण 3 असून क्षमता 105 जणांची आहे.
यामध्ये कर्नाटकातील 26,
तामिळनाडूमधील 40,
राजस्थानमधील 2,
मध्यप्रदेशमधील 25, 
उत्तर प्रदेशमधील 19,
केरळमधील 3,
आंध्रप्रदेश  2,
झारखंड  4,
बिहार 1 अशा एकूण 9 राज्यातील 122 जणांचा तसेच महाराष्ट्रातील 64 असे मिळून 186 व्यक्तींचे संस्थात्मक अलगीकरण करण्यात आले आहे.
0000

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.