** जिल्हा माहिती कार्यालयाच्या संकेतस्थळावर आपले स्वागत ** बातम्या, लेख, पर्यटन विषयक माहिती, पत्रकारांसाठीच्या विविध योजना, लोकराज्यसह इतर **

Thursday, May 21, 2020

जिल्ह्यात एकूण 182 पॉझीटिव्ह शाहूवाडीत सर्वाधिक 52 -डॉ. बी. सी. केम्पी पाटील



कोल्हापूर,दि. 21 (जिल्हा माहिती कार्यालय): आज सकाळी 10 वाजता 346 प्राप्त अहवालापैकी 3 अहवाल पॉझीटिव्ह आले आहेत. आजअखेर जिल्ह्यात एकूण 182 पॉझीटिव्ह रुग्ण असून त्यामध्ये सर्वाधिक शाहूवाडीत 52 रुग्ण आढळले आहेत, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बी. सी. केम्पी-पाटील यांनी आज दिली.
            तालुका, नपा आणि मनपा क्षेत्रनिहाय रुग्णांची संख्या पुढीलप्रमाणे - आजरा- 11, भुदरगड- 18, चंदगड- 6, गडहिंग्लज- 5, गगनबावडा- 3, हातकणंगले- 1, कागल- 1, करवीर- 11, पन्हाळा- 13, राधानगरी- 33, शाहूवाडी- 52, शिरोळ- 5, नगरपरिषद क्षेत्र- 6, कोल्हापूर महापालिका क्षेत्र-13 असे एकूण 178 आणि पुणे-1, कर्नाटक-2 आणि आंध्रप्रदेश-1 इतर जिल्हा व राज्यातील चौघे असे मिळून एकूण 182 रुग्णांची आजअखेर जिल्ह्यात संख्या आहे.
00000

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.