** जिल्हा माहिती कार्यालयाच्या संकेतस्थळावर आपले स्वागत ** बातम्या, लेख, पर्यटन विषयक माहिती, पत्रकारांसाठीच्या विविध योजना, लोकराज्यसह इतर **

Friday, May 15, 2020

राज्याबाहेर जाणाऱ्या व राज्याबाहेरुन येणाऱ्या 42 हजार 393 व्यक्ती -जिल्हाधिकारी दौलत देसाई



कोल्हापूर, दि. 15 (जिल्हा माहिती कार्यालय) : लॉकडाऊनमुळे जिल्ह्यात अडकलेल्या राज्याबाहेर जाणाऱ्या आणि राज्याबाहेरुन जिल्हयात येणाऱ्या 42 हजार 393 व्यक्ती  तर महाराष्ट्र राज्यातील अन्य जिल्हयामध्ये जाणाऱ्या आणि महाराष्ट्रातील अन्य जिल्हयामधुन येणाऱ्या 19 हजार 89 व्यक्ती असल्याची माहिती जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिली.
जिल्हयातून राज्याबाहेर जाणाऱ्या आणि राज्याबाहेरुन जिल्हयात येणाऱ्या 42 हजार 393 व्यक्तींमध्ये राज्याबाहेर जाणाऱ्या 41 हजार 94 तर राज्याबाहेरुन जिल्हयात येणाऱ्या 1 हजार 299 व्यक्तींचा समावेश आहे.  तसेच महाराष्ट्र राज्यातील अन्य जिल्हयामध्ये जाणाऱ्या आणि महाराष्ट्रातील अन्य जिल्हयामधुन येणाऱ्या 19 हजार 89 व्यक्तींमध्ये महाराष्ट्र राज्यातील अन्य जिल्हयामध्ये जाणाऱ्या 11 हजार 395 तर महाराष्ट्रातील अन्य जिल्हयामधुन येणाऱ्या 7 हजार 694 व्यक्तींचा समावेश असल्याचेही जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी सांगितले.
00000

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.